spot_img

थेट सरपंचपदांसह ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान सरपंच आखाड्यात उतरण्यासाठी सज्ज, गल्ली बोळात चर्चेला उधाण !

 

बुलडाणा, दि. 4 :(रवींद्र वाघ. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)

जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दि. 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली असून दि. 6 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होणार आहे. यासोबतच 59 ग्रामपंचायतीच्या रिक्त थेट सरपंच आणि सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

 

जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, तसेच नव्याने स्थापित आणि सन 2022 मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणुका होऊ शकलेल्या नाही अशा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी संगणक प्रणालीद्वारे तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी पारंपारिक पद्धतीने राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

 

सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी दि. 6 ऑक्टोबर 2023 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करतील.

नामनिर्देशनपत्र दि. 16 ऑक्टोबर 2023 ते दि. 20 ऑक्टोबर 2023 दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेदरम्यान दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. 23 ऑक्टोबर 2023 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत दि. 25 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी दुपारी 3 वाजल्यानंतर निवडणूक चिन्हाचे वाटप होईल. मतदान दि. 5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी दि. 6 नोव्हेंबर 2023 रोजी होईल. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे दि. 9 नोव्हेंबर डिसेंबर 2023 रोजी निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

थेट सरपंचपदांसह ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान
सरपंच आखाड्यात उतरण्यासाठी सज्ज, गल्ली बोळात चर्चेला उधाण !
बुलडाणा, दि. 4 :(रवींद्र वाघ. रोखठोक न्यूज वृत्त सेवा) जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दि. 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली असून दि. 6 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होणार आहे. यासोबतच 59 ग्रामपंचायतीच्या रिक्त थेट सरपंच आणि सदस्यपदाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या, तसेच नव्याने स्थापित आणि सन 2022 मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणुका होऊ शकलेल्या नाही अशा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी संगणक प्रणालीद्वारे तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणुकीसाठी पारंपारिक पद्धतीने राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी दि. 6 ऑक्टोबर 2023 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची सूचना प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र दि. 16 ऑक्टोबर 2023 ते दि. 20 ऑक्टोबर 2023 दरम्यान सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेदरम्यान दाखल करता येतील.

नामनिर्देशनपत्रांची छाननी दि. 23 ऑक्टोबर 2023 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत दि. 25 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी दुपारी 3 वाजल्यानंतर निवडणूक चिन्हाचे वाटप होईल.

मतदान दि. 5 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी दि. 6 नोव्हेंबर 2023 रोजी होईल. जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे दि. 9 नोव्हेंबर डिसेंबर 2023 रोजी निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

गाव खेड्यात सरपंच कोण होणार

गाव खेड्यातील होणारी ग्रामपंचायत निवडणूकीत कोण उभे राहणार , गावासाठी सरपंच कसा पाहिजे . गावातील समस्या मांडण्यासाठी कोण पुढाकार घेईल .कोण खर्च करेल . कोणत्या पार्टीत उभे राहायचे अशा अनेक चाचपणीची गावात चर्चा सुरू आहे. यासाठी गावात चर्चेला उधाण आले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या