spot_img

आरक्षण द्या अन्यथा मतदानावर बहिष्कार धनगर समाज आक्रमक ,मेहकरात उपोषण सुरू

 

मेहकर — (अनिल मंजुळकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)

आरक्षण मुद्द्यावरून महाराष्ट्रातील धनगर समाज गेल्या कित्येक दिवसापासून आक्रमक झाला आहे लोकशाही मार्गाने आंदोलने करून आपल्या हक्काचे आरक्षण सरकारकडे मागत आहेत मात्र सरकारकडून नेहमीप्रमाणे केवळ आश्वासनाची खैरात देण्यात येत असल्याने अनेक ठिकाणी धनगर समाजाचे आंदोलन तीव्र रूप घेत असल्याचे चित्र दिवसेंदिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दिसून येत आहे याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे एक आक्टोंबर पासून धनगर समाजाच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून धनगर समाज आक्रमक झाला आहे आरक्षण द्या अन्यथा भविष्यात होणाऱ्या महाराष्ट्रातील कोणत्याही निवडणुकीवर बहिष्कार घालू अशी ठाम भूमिका धनगर समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे

धनगर समाजाला एसटीमध्ये आरक्षण मिळावे यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलने सुरू आहेत कोणतेही सरकार आले की केवळ आश्वासने देण्यात येतात निवडणुका जवळ आल्या की धनगर समाजाची मते मिळविण्यासाठी आश्वासनाची खैरात देण्यात येते मात्र आता धनगर समाज बांधव सुद्धा हुशार झाले असून आरक्षण द्या अन्यथा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकू अशी ठाम भूमिका हळूहळू धनगर समाज घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे

मेहकर येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धनगर समाजाचे गजानन बोरकर यांनी एक आक्टोंबर पासून आमरण उपोषण सुरू केले आहे तर जवळपास 50 जण दररोज साखळी उपोषण करणार आहेत त्यामुळे मेहकर येथील उपोषण भविष्यामध्ये काय स्वरूप घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे

यावेळी साखळी उपोषण मध्ये लाभाडे साहेब डोणगाव प्रा. विठ्ठलराव गिलवरकर गुंधा अँड. रामेश्वर शेवाळे जानेफळ एकनाथ खराट शेलगाव देशमुख धनुभाऊ रौदंळे विष्णु साखरे शिवाजी साखरे औदगे श्रेणी सारंगपूर धोंडूजी गायकवाड सुपुर रामभाऊ लोणकर
गणेश वैध राजु खोरणे रविंद्र गुरव
खामगांव सुरेशराव काळे शेलगांव
रामप्रसाद खोडवे उकळी सतिश पातळे सुरेशराव औदगे प्रत्याद गोरे
पुरुषोतम ओदगे दत्ता खराट कुंदन हुले निदेश पावडे उकळी देविदास कराटे अनिल ढवळे बद्रीनाथ भाऊ गावडे बिबी यांचा समावेश आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या