spot_img

मेहकर येथील इसमाची ऑनलाईन फसवणूक करणारे दोन नायजेरीयन आरोपीना सायबर पोलिसांनी घेतले ताब्यात

 

मेहकर (अनिल मंजुळकर.रोखठोक न्युज वृत्त सेवा)

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे पॅथॉलॉजी लॅब चालवणाऱ्या एका व्यक्तीची फेसबुक वर फ्रेंड रिक्वेस्ट आलेल्या लंडन येथील मारिया जोन्स नावाच्या खाते चालवणाऱ्या व्यक्तीकडून 65 लाख रुपयाने ऑनलाईन फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, दिलेल्या तक्रारीवरून बुलढाणा सायबर क्राईम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे .

या घटनेची पार्श्वभूमी पुढीलप्रमाणे आहे. दीपक शिवराम जैताळकर हे मेहकर शहरामध्ये जीवनज्योती क्लिनिक नावाची पॅथॉलॉजी लॅब चालवत आहेत, त्यांना काही महिन्यापूर्वी आपल्या फेसबुक वर मारिया जोन्स या फेसबुक अकाउंट वरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आली, आणि नंतर ऑनलाईन चॅटिंग करत एकमेकांना व्हाट्सअप नंबर देण्यात आले,

व्हाट्सअप वर त्यांची मैत्री झाली, दरम्यान या अकाउंट वरून एक गिफ्ट पाठवून दिले असून त्यासाठी हे पार्सल दिल्ली येथील एअरपोर्टवरून सोडवून घेण्यासाठी कॉल आले, आणि अज्ञात व्यक्तीने 65 हजार रकमेचे ब्रिटिश पाउंड देण्याच्या नावाखाली इतर कागदपत्रे काढण्यासाठी वेगवेगळ्या तारखेत रक्कम भरणार करायला लावून एकूण 62 लाख 69 हजार 700 रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची तक्रार दीपक जैताळकर यांनी बुलढाणा सायबर क्राईम पोलीस ठाण्यात दिली होती.

त्यावरून सायबर पोलिसांनी कलम 420, 465, 468, 470, 471 भारतीय दंड विधान सह कलम 66 क, 5 आय टी अक्ट नुसार गुन्हे दाखल केले होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या