मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा )
आराध्य दैवत श्री शारंगधर बालाजी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर उघड्यावर होत असलेली मास विक्री तसेच श्री क्षेत्र ओलांडेश्वर मंदिर समोर असलेली अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावी या मागणीसाठी शारंग बालाजी मंदिराचे विश्वस्त व भक्तांनी नगरपरिषद कार्यालय समोर दोन ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण सुरू केले असून टाळ मृदंगाच्या तालावर उपोषणाला सुरुवात झाल्याने मेहकर शहरांसह तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
स्थानिक शारंगधर बालाजी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर उघडपणे मास विक्री होत असून दर्शनासाठी येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांच्या भावना दुखावल्या जात असून तात्काळ या रस्त्यावरील अतिक्रमण व होत असलेली मास विक्री बंद करावी, तहसील चौक ते श्री बालाजी संस्थान या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे ,श्री बालाजी संस्थान व ओलांडेश्वर मंदिर या रस्त्यावरील असलेले ऑटो रिक्षा स्टॅन्ड व रस्त्यात उभे राहत असलेले वाहनावर कायमस्वरूपी कारवाई करून या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे , महात्मा फुले भाजी मार्केटचे पाच गेट पैकी चार गेटवरील अतिक्रमण काढून नागरिकांसाठी मार्केटचा रस्ता मोकळा करण्यात यावा, अशा मागण्या यापूर्वी नगरपरिषदेला अनेक वेळा निवेदनाद्वारे भाविक भक्तांनी दिले होते
मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतेही दखल घेतली नसल्याने शेवटी श्री शारंगधर बालाजी मंदिराचे विश्वस्त बबलू मुंदडा, ह भ प भागवत महाराज भिसे व सामाजिक कार्यकर्ते संतोष मलोसे यांनी बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून लाक्षणिक उपोषणासाठी एड संजय सदावर्ते, द्वारकादासजी शर्मा, विलास आखाडे सह अनेक भक्तगण बसले आहेत जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा आंदोलन मागे घेणार नाही असा गंभीर इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे। या बेमुदत उपोषणास श्री शारंगधर बालाजी मंदिराचे अध्यक्ष यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा जाहीर केला आहे. या उपोषणाची मेहकर शहरांसह सगळीकडे चर्चा होतांना दिसत आहे.
शासनाच्या उदासीतेमुळे मेहकर शहरात उपोषणाला सामोरे जावे लागत आहे अशी भावना बालाजी संस्थांचे अध्यक्ष संजय सदावर्ते यांनी व्यक्त केली वेळो वेळी प्रशासनाला निवेदने देऊन देखील कोनत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही .