चिखली ( एकनाथ माळेकर . रोखठोक न्यूज वृत्त सेवा)
अंढेरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार विकास पाटील यांनी अवैध वाळू वाहतूक विरोधात आज आणखी एक कार्यवाही करत धडक मोहीम उघडली असून त्यामुळे वाळू माफियाचे कंबरडे मोडले आहे. दिनांक २८ सप्टेंबर रोजी सकाळी ९:३०-१० वाजेचा दरम्यान चींचखेड ता. देऊळगाव राजा वरून इसरुळ कडे एक अवैध वाळूने भरलेले ट्रॅक्टर इसरुळ कडे येत असल्याचे भ्रमणध्वनीद्वारे गोपनीय बातमीदार यांच्याकडून अंढेरा पोलीस स्टेशन ठाणेदार यांना माहिती मिळाली. त्याची त्यांनी तात्काळ दखल घेतली. योगायोगाने त्याचवेळी इसरुळ बिटचे मोरसिंग राठोड हे ईद- मीलाद च्या बंदोबस्त कार्यक्रम साठी उपस्थीत होते त्यांना सुचित करून इसरुळ ते बायगांव खुर्द रोडवर अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टरला एका आरोपीसह ताब्यात घेतले.
अवैध वाळू वाहतूकीमुळे अनेक अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला तर काहींना अपंगत्व आलं आहे त्यामुळे सण उत्सवाच्या काळात जिल्ह्यात अपघात होऊन कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा सुव्यवस्था चा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सुनिल कडासने यांनी रेती वाहतूक चोरी विरोधात २३ सप्टेंबर रोजी सर्व पोलीस स्टेशनला बिनतारी संदेश पाठवून त्यामध्ये अवैध वाळू व गौण खनिज वाहतूक करणारे चालक मालक तसेच त्यात सहभागी असणारे इसम यांच्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करावी अशे आदेश दिले. तसेच संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीत जर अवैध्य रेती वाहतूक करणारे वाहन निदर्शनास आल्यास त्या पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही करणार.. तसेच उपविभागीय अधिकारी यांनी त्यांच्या उपविभागात येणाऱ्या सर्व ठाणेदार यांना रेती वाहतूक चोरी बाबत जास्तीत जास्त कार्यवाही करणे बाबत मार्गदर्शन करून उपविभागात अवैद्य रेती गौण खणीज वाहतूक होणार नाही याची दक्षता घ्यावी असे नमूद केले.
७ सप्टेंबर रोजी चिखलीचे नायब तहसिलदार संतोष मुंढे व त्यांचे सहकारी यांच्या वाहनावर झालेला जीवघेणा हल्ल्यानतंर आरोपीस अटक न झाल्याने जिल्हा नायब तहसीलदार, तहसीलदार संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदन मुळे अंढेरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार विकास पाटील यांच्यावर टीका झाली होती.
परंतु त्यानंतर मात्र मागील काही दिवसांपासून अंढेरा पोलीस स्टेशन ठाणेदार विकास पाटील हे “ॲक्शन” मोड दिसले आणि त्यांनी गेल्या १० दिवसात अवैध रेती माफिया विरोधात अनेक धडाकेबाज कारवाया केल्या असून त्यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करीत अनेक रेती वाहतूक करणारे वाहने व वाळू उपसा करणारी बोटचे लाखो रुपयांचे साहित्य जप्त केले.
त्यात आणखी एक धडाकेबाज कार्यवाही केली.
या कारवाई वेळी ट्रॅक्टर चालकाने मागील घटनेतील टीप्पर चालकाप्रमाणे वाळू खाली करून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु शेतरस्ता अरुंद असल्याने ठाणेदार विकास पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करत ट्रॅक्टर त्याचा चालक आरोपी दिपक भगवान शेळके रा. मंडपगाव वय २३ यास ताब्यात घेतले. तर दुसरा सहआरोपी पळून गेला. उपस्थित पंचासमक्ष खाली केलीली वाळू पोकल्यांड च्या साह्याने ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये भरून विनानंबर लाल रंगाचा ट्रॅक्टर किंमत ७ लाख व १ बरास रेती किंमत ५ हजार हा माल पोलीस स्टेशन ला लावला.
या कारवाईत आरोपी १) दीपक भगवान शेळके रा.मंडपगाव व २) विवेक उर्फ बबलू शिवाजी वायाळ राहणार चींचखेड दोघेही तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा यांच्यावर अप. क्र.२८१/२३ कलम ३७९ ३४ भा. द. वी. सहकलम २१(१) (२) गौण खनिज अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या कार्यवाही वेळी सोनकांबळे, निवृत्ती पोफळे, भागवत गिरी, चालक खार्डे उपस्थित होते. पुढील तपास अधिकारी PSI मोरसिंग राठोड हे करीत आहे
रेती बाबत गावातील व्हॉट्स ॲप ग्रुप वर फिरत्या मेसेजची चर्चा
इसरुळ गावात कुणाला रेती लागत असेल तर रेती मिळेल या आशयाचे मॅसेज येथील महाराष्ट्र देशा या ग्रुपवर फिरत होते.