मेहकर ( अनिल मंजुळकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)
लवकरच विविध निवडणुका सुरू होत आहे त्या दृष्टीने प्रत्येक पक्षाकडून आपापल्या मतदारसंघात किंवा सर्कलमध्ये मोर्चे बांधणी सुरू आहे अशावेळी राजकीय पक्षाचे कार्यक्रम प्रत्येक मतदारसंघात युद्ध पातळीवर राबविण्यासाठी सर्वच पक्ष सतत प्रयत्न करीत आहेत मात्र काँग्रेसमध्ये 27 सप्टेंबर रोजी एक अजब कारभार पाहायला मिळाला काँग्रेसचे राष्ट्रीय नेते बुलढाणा जिल्ह्यात सुरुवातीपासून आपली पकड असलेले मुकुलजी वासनिक यांचा 27 सप्टेंबर रोजी वाढदिवस होता
त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा कार्यकारणी कडून सर्वांना सूचना करण्यात आल्या होत्या की काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते मुकुलची वासनिक यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करावा अशा सूचना सर्वच तालुका स्तरावर व शहर स्तरावर देण्यात आल्या होत्या मात्र मेहकर मध्ये या सूचनेचे कुठेच पालन होताना दिसून आलेले नाही वासनिक यांचा वाढदिवस मेहकर मध्ये पाहिजे तसा बिलकुल ही साजरा झालेला नाही काँग्रेसचे मेहकरातील नेते पदाधिकारी व जे येणाऱ्या निवडणुकीवर फक्त सत्तेसाठी डोळा ठेवून आहेत असे अनेक जण दिल्ली येथे गेले होते दिल्ली येथे जाऊन त्यांनी मुकुलजी वासनिक यांचा भावपूर्ण सत्कार केला मात्र या नेत्यांच्या भावपूर्ण सत्कारामुळे मेहकरातील कार्यकर्ते व मतदार वर्ग मात्र तीव्र नाराज दिसून येत आहे कारण मुकुलजी वासनिक यांचे कोणतेच बॅनर मेहकर तालुक्यात लागल्याचे दिसून आले नाही . त्याचबरोबर सामाजिक उपक्रमही राबविण्यात आलेले नाहीत त्यामुळे जे नेते मुकुलजी वासनिक यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले होते.
त्यांना मेहकरातील कार्यकर्त्यांचा व मतदारांचा विसर पडला किंवा त्यांना कार्यकर्त्यांची व मतदारांची गरजच उरली नाही का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे मात्र काहीही असले तरी मुकुलजी वासनिक यांचा वाढदिवस मेहकर मध्ये साजरा होणे सध्याच्या परिस्थितीत गरजेचे होते कारण एक राजकीय वातावरण किंवा काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण लोकांपर्यंत पोहोचले असते मात्र तसे होताना दिसून आले नाही त्यामुळे या राजकीय नेत्यांनी मुकुल वासनिक यांना दिल्ली येथे जाऊन शुभेच्छा देऊन नेमके काय साध्य केले हे न उलगडणार कोड आहे.
केवळ सत्तेसाठी व आपल्याला तिकीट मिळालं पाहिजेत यासाठी फक्त राष्ट्रीय नेतेच खुश ठेवायचे व कार्यकर्ते व मतदार वर्ग वाऱ्यावर सोडायचा हे काँग्रेसच्या नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना कितपत योग्य वाटते असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे मात्र काहीही झाले तरी मुकुलजी वासनिक यांचा वाढदिवस मेहकर मध्ये साजरा न झाल्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये व मतदारांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे एवढे मात्र खरे .
दिल्ली दरबारी दिसणारे मेहकरातील काँग्रेसचे नेते एकसंघ दिसत असले तरी मेहकरात कधी जवळ येताना दिसले नाही.
मेहकरातील काँग्रेसचे दोन गट जगजाहीर….
फोटोमध्ये दिसणारे सर्व काँग्रेस नेते यांची एक जुट कधी दिसली नाही. एकमेकांना पाडण्यासाठी व गट तयार केले आहेत. यामुळे कार्यकर्ते आमने-सामने सुध्दा झालेत. यामध्ये शाम उमाळकर , अनंतराव वानखेडे, विलास चनखोरे , कलीम खान , माजी नगराध्यक्ष कासम भाई गवळी , देवानंद पवार , भास्कर ठाकरे , दिगंबर मवाळ , नंदु बोरे , वसंतराव देशमुख , व इतर काँग्रेस नेते यांचे आपसात एकमेकांवर कुरघोडी करताना दिसत असतात. त्यामुळे इतर पक्षांना मदत होत असल्यामुळे मेहकर शहरांसह तालुक्यात काँग्रेसचे कार्यकर्ते गोंधळात पडतात. यामुळे सर्वेसर्वा मुकुल वासनिक यांनी काँग्रेस नेत्यांची दिल्ली दरबारी कार्यशाळा पार पाडावी. व मतभेद दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी काँग्रेसचे कार्यकर्त्यांमध्ये होत आहे.