spot_img

समृद्धी महामार्गावर टायर फुटल्याने स्विफ्ट गाडीचा अपघात ,अपघातात एक गंभीर तर चार जण जखमी 

बिबी (ऋषीं दंदाले . रोखठोक न्यूज वृत्त सेवा)

आज दिनांक 22/09/2023 वेळ दुपारी 3 वाजता संभाजी नगर येथुन मेहकरला येत असतां ना भरधाव वेगाने कार चालवुन 3 वाजे दरम्यान समृद्धी महामार्गावर चैनल नंबर 303 वर अपघात झाल्याची घटना बिबी पोलिस स्टेशन अंतर्गत घडली असून एक गंभीर तर चार जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार संभाजीनगर येथून स्विफ्ट डिझायर क्रमांक MH 04 GD 2015 या गाडीने मेहकरला मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमासाठी येत असताना बिबी पोलीस स्टेशन अंतर्गत खळेगाव चैनल क्रमांक 303 या ठिकाणी भरधाव वेगात चालकाने वाहन चालून वाहनाने दोन-तीन पलट्या मारल्या. यामध्ये चालक अफरोज खान इब्राहिम खान वय 34, हा जागीच ठार झाला तर इब्राहिम खान व शेख रसूल शेख अब्दुल हे जखमी झालेत.

सर्वांना मेहकर येथे सरकारी दवाखान्यांमध्ये भरती करण्यात आले. व पुढे संभाजी नगर येथे रेफर करण्यात आले आहे. यासाठी यांना मदत कार्य करण्यासाठी

बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सदानंद सोनकांबळे व पोलीस हेड कॉ राजेश सरदार यांनी तातडीने माहिती मिळताच मदत कार्य केले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या