मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)
भारत सरकारच्या पेयजल मंत्रालय अंतर्गत देशातील ग्रामीण कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला दरडोई दररोज किमान 55 लिटर शुद्ध व पुरेसे पाणी दिर्घकाळ उपलब्ध करून देणारा जलजीवन मिशन हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. सदर जलजीवन मिशन अंतर्गत दिले जाणारे दोन दिवशीय क्षमता बांधनी प्राशिक्षण गावे पाणीदार करण्यासाठी , पाणी पुरवठा योजनेला
चालना देणारे असुन गावामध्ये जनजागृती करणारे आहे असे त्यासाठी पानी स्त्रोत,बलकटिकरनयोजना देखभाल दुरुस्ती जबाबदारी गावास घ्यायची आहे मत पंचायत समिति दे राजा चे गटविकास अधिकारी एम.एस.माहोर यांनी दे राजा येथे आयोजित जलजीवन मिशन अंतर्गत आयोजित भागधारकांचे प्राशिक्षण कार्यक्रमास प्रत्यक्ष भेटी दरम्यान मार्गदर्शन करताना व्यक्त केले.
सदर प्रकल्प कालावधीत पूर्ण करून आपले गाव हर घर जल करण्यासाठी जलजीवन मिशन प्रकल्प अंतर्गत पाणी पुरवठा व स्वछता विभाग महाराष्ट्र शासन, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जिल्हा परिषद,
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद बुलढाणा, पंचायत समिति दे राजा, यांच्या वतीने दे राजा तालुक्यातील ४८ ग्रामपंचायत च्या भागधारकांसाठी होटेल गोकुळ येथील ३ बैच व होटल योगिराज येथे दिनांक २० सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०२३ या कालावधीत ४ बैच मध्ये आयोजित दोन दिवशीय क्षमता बांधनी कार्यक्रम संपन्न झाला.
सदर प्रशिक्षण कार्यक्रम मा. श्रीमती भाग्यश्री विसपुते, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलडाणा यांच्या मार्गदर्शनाखाली मा. श्री. शंकर भारसाखळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक जल जीवन मिशन जिल्हा परिषद बुलढाणा यांच्या नियंत्रणात संपूर्ण जिल्हाभर सुरू आहे.
प्रशिक्षण सुरळीत पार पाडण्यासाठी मा. मनीषा शेजव, मनुष्यबळ विकास अधिकारी जल जीवन मिशन जिल्हा परिषद बुलढाणा यांचे पर्यवेक्षन सुरू आहे.
सदर कार्यक्रमाचे उद्घघाटन गट विकास अधिकारी एम. एस.माहोर साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली आरोग्य विस्तार अधिकारी आर. एस. शिंदे, सी आर सी- एस.एल.पवार यांनी महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करून केले.
प्रशिक्षण व्यवस्थापक सुदर्शन पवार, अम्बादास खड्सन प्राशिक्षण समन्वयक गजेंद्र गवई यांचे मार्गदर्शनाखाली
दे राजा तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतीच्या ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिति च्या पदाधिकारी ज्यामध्ये सरपंच, ग्रामसेवक, अंगनवाड़ी सेविका,आशा सेविका, जलरक्षक, बचतगट प्रतिनिधी, यांचे साठी दिनांक २० सप्टेंबर ते २१ सप्टेंबर २०२३ या कालावधीत ४ बैच मध्ये दोन दिवशीय कालावधीचे गावातील लोकांना ग्रामस्तरिय क्षमता बांधनी प्रशिक्षण देण्यात आले.
सदर दोन दिवशीय प्रशिक्षणात जलजीवन मिशन योजना, उद्देश्य, ध्येय, गावकृति आराखडा,पाणी स्त्रोतांचे बळकटिकरण, लोकवाटा, लोकसहभाग, श्रमदान, समिति पदाधिकारी भूमिका जबाबदारी, बांधकाम पर्यवेक्षण,याजनेचे टप्पे नियोजन,अंमलबजावणी, देखभाल दुरुस्ती, पाणी नमूने तपासणी इत्यादि विषयावर सत्रनिहाय मास्टर ट्रेनर गजेंद्र गवई, यांचे सह प्रशिक्षक मछिन्द्र हिवराले, ,छगन खरात, प्रदीप जाधव, दर्शना वसावे, विनोद घनमोड़े मिलिंद, संतोष दाभाड़े, सावंत,योगिता खांडेभराड़,अर्चना अमझरे,युगंधरा सांगोड़े,वर्षा कांबले, जयश्री लोहवे,अनुराधा मोरे ,यांनी विविध सांघिक खेल, गितांचे अंतर्भाव करून प्रशिक्षण दिले..
समारोपिय कार्यक्रमात सर्व उपस्थित सहभागी प्रशिक्षणार्थी ना गटविकास अधिकारी एम.एस. माहोर,विस्तार अधिकारी पी एस म्हस्के, विस्तार अधिकारी कालूसे यांचे हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
प्रशिक्षण कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्य संसाधन संस्था ( KRC) चे कार्यक्रम समन्वयक सुदर्शन पवार , प्रकल्प व्यवस्थापक अम्बादास खड्सन यांचे सह पंचायत समिति दे राजा स्वच्छ भारत मिशन कक्ष चे बी आर सी श्री मिथुन जाधव सी आर सी – एस. एल. पवार, (BRC व CRC) तसेच संबंधित प्रशासकीय यंत्रणा व प्राशिक्षण सहाय्यक गौतम अवसरमोल,उमेश कटारे,महेंद्र बोरकर,राजू हिवरकर यांचे विशेष सहकार्य लाभले.