spot_img

चोरी होऊ नये म्हणून अशी घ्या काळजी…! -मेहकर पोलिस ठाणे च्या वतीने सावधानीबाबतचे पत्रक जारी ठाणेदार शिंगटे यांचा उपक्रम

 

मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्यूज वृत्त सेवा)

गाव किंवा शहरामधील नागरिकांच्या घरी चोरी होऊ नये, यासाठी मेहकर पोलिस ठाणे च्या वतीने विशेष काळजी घेण्याबाबतचे पत्रक जारी करण्यात आले आहे. हे पत्रक पोलिस निरिक्षक राजेश शिंगटे यांच्या सहीनिशी प्रसारित करण्यात आले आहे, या पत्रकात नमूद आहे, की बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना घराकडे लक्ष ठेवण्याची विनंती करावी, मौल्यवान दागिणे हे बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवावेत, रोख रक्कम जास्त प्रमाणात बाळगू नये, फोन पे –गुगल पे चा वापर करावा, बाहेर जाताना घराच्या मागील व पुढील बाजूसमोर लाईट लावावा, घराच्या दरवाज्याच्या बाहेर पडदा लावून कुलूप लावावे, जेणेकरुन कुलूप दिसणार नाही. चप्पल, बुट हे दरवाजासमोरच ठेवावेत, अशाप्रकारे विशेष काळजी घेण्याचे आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले आहे. यासोबतच, आपल्या गल्लीत किंवा गावामध्ये कोणी अनोळखी व्यक्ती आल्यास त्यावर पाळत ठेवावी. पोलिसांना त्वरीत माहिती द्यावी. आपल्या गावात कोणताही अनोळखी व्यक्ती हातगाडीने सामान विक्रीसाठी आला असता, सरंपच किंवा गाव पाटलाने त्याच्या आधारकार्डची झेरॉक्स जवळ ठेवावी, तसेच त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवावे. आपल्या मोबाईलद्वारा सणानिमित्त सवलत मिळत आहे, अशी खोटी बतावणी करणाऱ्या अशा कोणत्याही व्यक्तीला ओटीपी, सीसीव्ही सांगू नये. कोणत्याही प्रकारच्या लिंकवर क्लिक करू नये. एटीएम कार्ड वापरताना कोणत्याही अनोळख्या व्यक्तीकडे देऊ नये, आपले दुकान अथवा राहते घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, मोबाईल ॲपद्वारा कोणत्याही जातीधर्माच्या, समाजाच्या भावना दुखणार नाही, अशा पोस्ट टाकू नयेत.दागिणे पॉलिश करुन देतो, असे सांगणाऱ्यावर विश्वास ठेवू नये, असे आढळल्यास पोलिसांशी त्वरित संपर्क साधावा, कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये, आम्ही पोलिस आहोत, आम्हाला तुमची झडती घ्यायची आहे, तुमचे दागिणे काढून रुमालमध्ये ठेवा, असे सांगणाऱ्या तोतया पोलिसापासून सावधान राहा,कोणत्याही आक्षेपार्ह वस्तूंना हात लावू नका, पोलिसांना माहिती द्या, अडचणींच्या वेळेस त्वरित पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहनदेखिल करण्यात आले आहे. संशय आल्यास किंवा चोरी झाल्यास पोलिस निरिक्षक राजेश शिंगटे, मो. 9823348777, सपोनि शरद आहेर, मो. 8788585493, सपोनि संदीप बिरांजे मो. 8584052710, पोहेकॉ. सुरेश काळे, मो. 9049792239, पोहेकॉं विजय बेडवाल, 9075451239, पोहेकॉं अतुल पवार, 9552539492 यांच्याशी संपर्क साधावा, असेदेखिल पत्रकात नमूद आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या