spot_img

कंत्राटी पदभरती कायमची बंद करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

 

चंद्रपूर (किरण घाटे . रोखठोक न्यूज वृत्त सेवा )
महाराष्ट्रात बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे .अशातच शासकीय कार्यालयातील अनेक विभागात बरीच पदे रिक्त आहेत .सरकारी पद्धतीनुसार पदभरती न करता कंत्राटी पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे हे योग्य नाही.

कंत्राटी नोकर भरती ही शासनाचा पैसा वाचविण्याच्या नावावर काही राजकारणी आणि कॉर्पोरेट लॉबीला फायदा करण्याचे हेतूने घेण्यात आला आहे. तसेच हा निर्णय म्हणजे गरीब,बेरोजगार आणि सुशिक्षित तरूणांच्या भविष्याशी थट्टा करणारा आहे. या सर्व बाबींची दखल घेऊन हा निर्णय त्वरीत रद्द करावा, तसेच अलिकडे पार पडलेल्या तलाठी भरतीमधील गोंधळास जबाबदार असणा-यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी बल्हारपूर येथील संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

या संदर्भात अपेक्षित निर्णय न झाल्यास संभाजी ब्रिगेड राज्यस्तरावर भव्य आंदोलन उभारेल असा इशारा ही त्यांनी दिलेल्या एका निवेदनातून शासनाला दिला आहे.
संभाजी ब्रिगेड बल्लारपूरच्या वतीने तहसीलदार बल्लारपूर यांचे मार्फत शासनाला काल दि. २०सप्टेंबरला निवेदन देण्यात आले.यावेळी संभाजी ब्रिगेड बल्लारपूरचे शहर अध्यक्ष साहिल घिवे, कार्याध्यक्ष संकेत चौधरी, सचिव निखिल वडस्कर, उपाध्यक्ष रीतीक कोंडलेकर, रोहित चूटे, प्रणय कष्टी, आमिर अहमद, निलेश सुर आदिं उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या