लोणार : (विजय गोलेच्छा )लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने नैसर्गिक मित्र असलेल्या भाजपसोबत युती करून अनैसर्गिक महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. मात्र, भाजपने गरज म्हणून
अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे.शिवसेनेचा त्याच्याशी संबंध नसल्याचे वक्तव्य माजी राज्यमंत्री तथा शिवसेनेचे बुलढाणा जिल्हा पक्ष
निरीक्षक (शिंदे गट) यांनी १६ सप्टेंबर रोजी लोणार येथे केले.स्थानिक बाजार समितीमध्ये योजित पक्ष कार्यकर्ता संवाद बैठकीत ते बोलत होते. आ. डॉ. संजय रायमुलकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. खोतकर पुढे म्हणाले की,आगामी काळ निवडणुकांचा असल्याने पक्षाचा
तळागाळातील निवडणुकांमध्ये वाढविण्यासाठी कामाला लागण्याची असलेल्या कार्यकर्त्यांनी पक्षाची ताकद
आहे. लवकरच लांबलेल्या जिल्हा पंचायत समित्यांच्या
परिषद,निवडणुकाही होणार आहे. या कार्यकर्त्यासाठी
निवडणुका महत्त्वाच्या आहेत. पक्ष संघटना मजबूत
करण्यासाठी गाव तेथे शाखा, शाखा तेथे फलक लावून पक्ष संघटन मजबूत करण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन
त्यांनी केले. या बैठकीस जालना संपर्कप्रमुख पंडित भुतेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख बळीराम मापारी, भगवान
सुलताने, संतोष मापारी, अंजली गवळी, शिवकुमार तेजनकर, भगवान कोकाटे, जगाराव आडे, प्रकाश पोफळे, विजय सानप, कारभारी सानप, इम्रान खान
पठाण, डॉ. हेमराज लाहोटी, शालिक डव्हळे, संतोष आघाव, विश्वंभर दराडे यांच्यासह अन्य उपस्थित होते.