बुलडाणा,( प्रतिनिधी रोखठोक न्यूज वृत्त सेवा) : नेहरु युवा केंद्रातर्फे हिंदी दिवस व पंधरवाडा निमित्ताने जिल्हास्तरीय भाषण स्पर्धा शासकीय अध्यापक महाविद्यालयात पार पडली. या स्पर्धेत युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. ही स्पर्धा उत्साहात पार पडली.
जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हूणन शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सिमा लिंगायत, डॉ. हर्षानंद खोब्रागडे उपस्थित होते.
‘गांधी का वैश्विक प्रभाव-आज के समय में गांधीवादी विचारों की प्रासंगिकता’ या विषयावर स्पर्था घेण्यात आली. यात प्रथम हिवरा आश्रम येथील विवेक पिंजरकर, दुसरा अश्वीनी जाधव तर तृतीय क्रमांक पोखरी येथील अंजली औतकर यांनी पटकविला. प्रथम क्रमांक पटकविणारे विवेक पिंजरकर यांना दि.18 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित राज्यस्तरीय भाषण स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. विजेत्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेतील सर्व सहभागींना प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेचे परिक्षक म्हणून प्रा. गुलाबराव सोनोने, डॉ.अनिल वरघट, रणजितसिंग राजपूत, नेहरु युवा केंद्राचे कार्यक्रम पर्यवेक्षक अजयसिंग राजपूत उपस्थित होते.
राष्ट्रीय युवा स्वयंसेवक सुमित वाकोडे यांनी सूत्रसंचलन केले. अजयसिंग राजपूत यांनी संचलन मानले. कार्यक्रमासाठी धनंजय चाफेकर, माजी स्वयंसेवक विलास सोनोने यांनी पुढाकार घेतला.