spot_img

कमी वेळात जास्त पैश्याच्या मोहात लाखोचा रुपयांचा चुना …. लुबाडणूक झालेले म्हणतात ‘तेरी भी चूप …मेरी भी चूप…. कुठे सुरू होता प्रकार . वाचा सविस्तर बातमीत…

मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्त सेवा)
ग्रामीण भागात सोशल मीडिया द्वारे कित्येक युवक सध्या गंडवले जात आहेत काहींना फायदा झाला की ते इतरांना सांगतात त्याने कित्येक युवक गंडवल्या गेलेत “डॅप” किव्हा अन्य नाव लावून “ऐसा‘ऑनलाईन मनी मेकिंग लिंकच्या च्या’ माध्यमातून लोकांना जादा पैशाचे आमिष दाखवून कंपनीने लोकांची करोडो रुपयांची फसवणूक केली आहे.
सदर “डॅप” ही कंपनी तीन दिवसांत दीडपट,सात दिवसांत दुप्पट,पंधरा दिवसांत अडीचपट पैसे देण्याचे आमिष दाखवून लोकांकडून करोडो रुपये गोळा केले आहेत.

ज्या ग्राहकांचे पैसे तीन दिवसांत दीडपट, सात दिवसांत दुप्पट ,पंधरा दिवसांत अडीचपट झाले असतानादेखील कंपनीकडून संबंधित ग्राहकांना पैसे माघारी मिळाले नाहीत.
सदर कंपनी 1,000 रुपयांना दिवसाला 60 ते 63 रुपये, 3,000 हजार रुपयांना दिवसाला 210 ते 240 रुपये,8,000 रुपयांना दिवसाला 630 ते 670 रुपये, 20,000 रुपयांना दिवसाला 1,350 ते 1,900 रुपये,50,000 रुपयांना दिवसाला 2,900 ते 5,500 रुपये व 1 लाख 20,000 रुपये जमा केल्यास प्रत्येक दिवशी 12,000 रुपये देण्याचे आमिष दाखवून लोकांकडून पैसे गोळा करून “डॅप” व “ऐसा” या कंपनीने गाशा गुंडाळला आहे.

विशेष म्हणजे गाशा गुडाळण्या आधी तीन दिवस अगोदर 5 हजारा पासून तर 1 लाख रुपया परियंत 5 दिवसात दाम दुप्पट अशी बम्पर ऑफर आणली ज्यात अंजनी बु येथील ज्यांना फायदा झाला त्यांनी स्वतः आणि आपल्या जवळच्याना पैसे टाकायला लावले. ज्यांच्या जवळ पैसे नव्हते त्यांनी ऑनलाईन अँप मधून कर्ज काढून तर कित्येकानी घरात भांडून पैसे घेतले व पैसे टाकून फसले.

 


ऑनलाईन सिस्टम द्वारे पैसे कमावण्याच्या धंदा मांडला. दोन महिन्या पासून सुरू होता यात अगोदर काहींनी गेले म्हणून हजार ते दोन हजार गुंतवणूक केली त्यात त्यांना तीनपट ते चारपट पैसे मिळाले अश्यात त्यांनी माझ्या भरवश्यावर पैसे टाक माझे पैसे इतके झाले तुझे देखील होतील कारण त्यात चेन सिस्टम होता ज्यात जेव्हढे जास्त मेम्बर तेव्हढे जास्त रिवॉर्ड आणि कमिशन यात डोणगाव सह मेहकर तालुक्यातील परीसरातील कित्येक युवकांनी 25 ते 50 हजाराची गुंतवणूक केली त्यांना सुरवातीला पैसे आले दररोज त्यांचे पैसे विड्रोल व्हायचे याला पाहून अंजनी बु व परिसरातील लोकांनी चेन मध्ये शेकडो पेक्षा जास्त लोक सामील झाले होते यात कित्येकांनी सोशल मीडियावर या ऑनलाईन फ्रॉड संबंधी जनजागृती सुद्धा केली मात्र झटपट पैसा मिळतो या आशेवर कोणीही त्याकडे लक्ष दिले नाही .

 

अखेर ऑगष्ट पासून अडकलेला पैसा कसा काढायचा व त्या साठी संबंधित कंपनी कोणाची कुठली याची कोणतीही माहिती नाही ज्याने तेलही गेले तूपही गेले राहिला फक्त धुपाटने अशी अवस्था येथील युवकांची झाली त्यातल्या त्यात घरी सुद्धा सांगू शकत नाही पैसे कुठे व कसे गेले यात कित्येक कंपन्या आहेत त्यातील काही बंद पडल्या तर काही सुरू आहेत यात विशेष म्हणजे लुबाडणूक करणारी अँप ही प्ले स्टोरवर नसून एका लिंकच्या साहाय्याने डाउनलोड करावी लागत होती तर पैसे सुद्धा स्कॅनर च्या साह्याने घेतले जात होते तर विदेशी नंबरच्या साहाय्याने व्हाट्सएप चॅटींग करून महिला माहिती देत होती .

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या