spot_img

तिरंगा रॅली संदर्भात मेहकर तालुका व शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न… मेहकर येथे २१ मे रोजी होणाऱ्या तिरंगा रॅलीत बहुसंख्येने उपस्थित रहाण्याचे देवानंद पवार यांचे आवाहन….

मेहकर:- (अनिल मंजुळकर.रोखठोक न्युज वृत्तसेवा)

काही दिवसांपूर्वी पहेलगाम व काश्मीरसह भारतातील अनेक भागांमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या विरोधात भारतीय जवानांनी अतिशय चोखपणे प्रत्युत्तर दिले त्यामध्ये अनेक जवान शहीद झाले त्यांना श्रद्धांजली म्हणून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने संपूर्ण देशभरात तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे याचाच भाग म्हणून महाराष्ट्रात सुध्दा २१ मे रोजी तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे.

त्याच्या नियोजनार्थ मेहकर तालुका व शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक तालुका काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात प्रदेश काँग्रेस सरचिटणीस श्याम उमाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मेहकर तालुका निरीक्षक प्रा गजानन खरात, माजी जिल्हाध्यक्ष लक्ष्मणदादा घुमरे, तालुकाध्यक्ष देवानंद पवार, दिगंबर मवाळ, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भास्करराव ठाकरे,वसंतराव देशमुख,पंकज हजारी यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत नियोजनाची बैठक पार पडली.

यामध्ये 21 मे रोजी मेहकर येथील स्थानिक विश्रामगृह समोरून मुख्य मार्गाने लोणार बस स्टँड बालाजी मंदिर मार्ग तसेच परत मुख्य मार्गाने स्वातंत्र्य मैदान पर्यंत तिरंगा रॅली काढण्यात येणार असून या रॅलीस पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष देवानंद पवार यांनी केले.

यामध्ये या बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांना श्याम माळकर लक्ष्मण दादा घुमरे प्राध्यापक गजानन खरात दिगंबर वसंतराव देशमुख शैलेश बावस्कर आदींनी मार्गदर्शन केले यावेळी या बैठकीस प्रदीप देशमुख, भानुदास अजगर,भागवत डाखोरे,रमेश राठोड,विनायक टाले,भूषण काळे,गजानन राठोड,डॉक्टर शेषराव बदर,वामनराव मोरे गजेंद्र माने,कुंडलिकराव देशमुख,अभिमन्यू नवले, नारायण पचेरवाल,अलीम ताहेर, वैभव उमाळकर, नारायण इंगळे, किशोर गवई,नामदेव राठोड,तुकाराम चव्हाण महादेव ससाने,राजेश अंभोरे छोटू गवळी,दिलीप बोरे, एडवोकेट गोपाल पाखरे, राजेंद्र गायकवाड, रवींद्र शेळके यांच्यासह बहूसंख्य पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या