शिवसेना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे माजी आमदार संजय रायमुलकर यांनी आधुनिकीकरण केले.सदर सर्वसुविधायुक्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण आज केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते व संजय रायमुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
लोणार मेहकर विधानसभा मतदार संघासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर्फे रुग्णांच्या सुविधेसाठी रुग्णवाहिका देण्यात आली होती. या रुग्णवाहिकेत सर्व वैद्यकीय साधनसामग्री बसवून माजी आमदार संजय रायमुलकर यांनी मतदार संघातील गरजू रुग्णांच्या सोयीसाठी स्वतः १८ लाख रुपये खर्चून ही रुग्णवाहिका अद्ययावत केली.
आज केंद्रीय आयुष, आरोग्य, कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते आणि संजय रायमुलकर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम मापारी, तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर ,माजी नगराध्यक्ष रामराव म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णवाहिकेचे रितसर लोकार्पण करण्यात आले.
गरजू रुग्णांना ही रुग्णवाहिका माफक दरात उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे दोन्ही तालुक्यातील नागरिकांना याचा मोठा फायदा होईल ,असे यावेळी बोलताना ना. प्रतापराव जाधव म्हणाले. विविध प्रकारची मदत करून मेहकर ,लोणार तालुक्यातील रुग्णांना शिवसेनेकडून नेहमीच वैद्यकीय मदतीचा हात देण्यात येतो. सर्व सुविधांनी युक्त रुग्णवाहिकेची आवश्यकता असल्यामुळे मुंबई येथून आवश्यक ती वैद्यकीय यंत्रसामुग्री बसवून ही रुग्णवाहिका रुग्णांसाठी आजपासून उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे माजी आमदार संजय रामुलकर म्हणाले.