spot_img

अवैध धंद्याना विरोध करतो म्हणून सरपंच पतीला मस्साजोगच्या सरपंचा सारखा गेम करण्याची अवैध धंदे व्यवसायकाची धमकी दिल्याने एकच खळबळ

मेहकर:-(समाधान पदमने. रोखठोक न्युज वृत्तसेवा)
तू माझ्या अवैध धंद्याला विरोध करशील तर तुझा दुसरा मस्साजोगचा सरपंच संतोष देशमुख करून टाकीन असे बोलत सरपंच पतीचा गळा आवळून इतर तिघांनी मिळून खिशातील नगदी पैसे व सोन्याचे दागिने मिळून एकूण १लाख २७ हजार रुपयांचा ऐवज जबरीने हिसकावून नेल्याची तक्रार कळंबेश्वर तालुका मेहकर येथील सरपंच पती सुभाष मनोहर खुरद यांनी जानेफळ पोलीस स्टेशनला दिली आहे.
त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की गावातील अवैध धंद्यांना आळा घालण्याचा प्रयत्न करीत असल्याने गावातीलच चिडलेल्या अवैध धंदे व्यवसाय करणारा आरोपी गणेश शंकर भराड वय ४२ वर्ष, आकाश गोविंद सपकाळ वय ३० वर्ष दोन्ही रा. कळमेश्वर ता. मेहकर जि. बुलडाणा व अज्ञात ३ इसम यांनी आपण गावातील एका महिलेच्या अंत्यविधीसाठी दि.३१ डिसेंबर रोजी गावा शेजारीच स्मशानभूमीत गेलो असता गेटमधून बाहेर निघत असताना आरोपी गणेश शंकर भराड याने माझा गळा आवळला व इतर अज्ञात ३ लोकांनी माझ्या खिश्यातील नगदी २५ हजार हजार रुपये, बोटातील ७ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी किंमत अंदाजे ४२ हजार रुपये,गळ्यातील सोन्याचा गोफ चैन वजन१० ग्रॅम किंमत अंदाजे ६० हजार हजार रुपये असा एकुण १ लाख २७ हजार रुपयाचा मुद्देमाल जबरीने हिसकावुन घेतल्याने आपण आरडा-ओरड केली.
तेव्हा आरोपी गणेश शंकर भराड याने तु माझ्या अवैध धंदयांना विरोध करशील तर तुझा मस्साजोगच्या सरपंचा सारखा गेम करून टाकीन अशा प्रकारची धमकी दिली तसेच त्यावेळी आकाश गोविंद सपकाळ व इतर अज्ञात ३ जणांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. अशा तक्रारीवरून उपरोक्त आरोपीं विरुद्ध अप नं.- 01/2025 कलम 309 (2), 115(2) 352, 351(2), 351(3) . 3(5) BNS -2023 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या