बुलडाणा: (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)
मोताळा तालुक्यातील राजूर येथील माजी सरपंच सुधाकर रोठे पाटील यांचे मोठे चिरंजीव भागवत रोठे पाटील राजुर आणि नांदुरा येथील शिवशंकर भामरे पाटील यांची ज्येष्ठ कन्या चि.सौ.कां.वैष्णवी पाटील नांदुरा यांचा आदर्श विवाह सोहळा आज 29 डिसेंबरला सायंकाळी जळगाव जामोदलां अत्यंत साध्या पद्धतीने संपन्न झाला.
वधू-वरांचा आज नियोजित साखरपुडा होता परंतु समाज बांधवांच्या विनंतीवरून समाज हितासाठी साखरपुड्यातच लग्न सोहळा संपन्न करण्यात आला.
कोणताही बडेजाव न करता निरर्थक खर्चाचा बाजूला सारून अत्यंत साध्या पद्धतीने समाजाला नवा आदर्श देण्यासाठी केलेल्या आदर्श विवाहाला समाज बांधवांनी वेळेवर दिलेल्या विनंती निमंत्रणाला प्रतिसाद देत बहुसंख्येने उपस्थिती दर्शविली.
राजुर येथील रोठे परिवार आणि नांदुरा येथील भामरे पाटील परिवाराचे मराठा समाज बांधवांनी कौतुक करीत अभिनंदन केले.नवदांपत्यास नवजीवनाच्या मंगलमय शुभेच्छा प्रदान करण्यासाठी पंचक्रोशीतील नातेवाईक,आप्तेष्ट वेळेवर दिलेल्या एका संदेशावर उपस्थित झाले.
त्याचबरोबर जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री डॉ.संजय कुटे, आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.सतीशचंद्र रोठे पाटील यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्रातील बहुसंख्य मान्यवरांची विवाह सोहळ्याला उपस्थिती होती. संपन्न झालेल्या आदर्श विवाह सोहळ्याला मोताळा,बुलढाणा, नांदुरा, मलकापूर तालुक्यासह जळगाव जामोद तालुक्यातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील बहुसंख्य प्रतिष्ठित मान्यवर, नातेवाईक,आप्तेष्टांनी वधूवरांना शुभ आशिष प्रदान करत भावी जीवनासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.