मेहकर: (हर्षल गायकवाड रोखठोक न्युज वृत्तसेवा)
भालेगाव येथे २८ लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या तलाठी भवनाचे भूमिपूजन माजी आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते आज करण्यात आले. येथील ४७ लाख रुपये खर्चाच्या पूर संरक्षण भिंतीचे भूमिपूजनही रायमुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव अध्यक्षस्थानी होते.

संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नातून मेहकर तालुक्यात तलाठी भवन व मंडल अधिकारी कार्यालय अशी १४ कोटी २३ लाख रुपये खर्चाची ५० बांधकामे मंजूर करण्यात आली होती. त्यांच्याच प्रयत्नातून तालुक्यातील लोणार तालुक्यातील ७ कोटी १७ लाख रुपये खर्चाचे २८ तलाठी भवन , ५ मंडळ अधिकारी कार्यालय अशी बांधकामे मंजूर करण्यात आलेली आहेत. सदर बांधकामे जवळपास पूर्णत्वास गेली आहेत. भालेगाव येथील तलाठी भवनाचे लोकार्पण संजय रायमुलकर यांच्या हस्ते पार पडले. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्या जवळील सौंदर्यीकरण कामाची पाहणी रायमुलकर यांनी केली.

नदीच्या पुरामुळे परिसरातील शेतीचे नुकसान होऊ नये व नागरिकांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून संजय रायमुलकर यांच्या प्रयत्नातून ४७ लाखाच्या पूर संरक्षण भिंत बांधकामाचे भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते करण्यात आले.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर, दिलीपबाप्पू देशमुख ,संबंधित विभागाचे सहाय्यक अभियंता श्री आडोळे, दत्ता गाडे ,तेजराव धोंडगे, मधुकर पाटील, समाधान महाराज ,सुभाष पाटील, अंबादास निकम ,रमेश धोंडगे, माजी प्राचार्य टी .बी. धोंडगे ,पोलीस पाटील मधुकर निकम ,सरपंच प्रवीण निकम, उपसरपंच मंगलाताई निकम ,शिवसेनेचे विभाग प्रमुख भास्कर निकम ,गणेश निकम, तेजराव डव्हळे, संदीप पुरी ,गजानन निकम, अशोक दाभाडे ,तोताराम धोंडगे ,प्रताप धोंडगे ,संजय झनक, श्रीकिसन धोंडगे, हिंमत गवई,गणेश खवले ,सखाराम वडतकर ,प्रल्हाद धोंडगे, अविनाश धोंडगे आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
मेहकर, लोणार मतदार संघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे मंजूर आहेत, परंतु आचारसंहिता लागल्यामुळे संबंधित कामांचे भूमिपूजन, उद्घाटन होऊ शकले नाही; असे यावेळी बोलताना संजय रायमुलकर म्हणाले. दोन्ही तालुक्यातील त्या त्या ठिकाणी आवश्यक असलेली विकासाची कामे राज्यात महायुती आणि सरकार असल्यामुळे यापुढेही आपण मंजूर करून आणू, असेही ते म्हणाले.