डोणगाव: (सचिन गाभणे. रोखठोक न्युज वृत्तसेवा)
मेहकर ते डोणगाव रोडवर लांडे वाडी फाटयाजवळ एका आयशर व स्कुटी चा अपघात होऊन एक तरुणी ठार झाल्याची घटना 18 डिसेंबर ला सकाळी 8.30 च्या दरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार मेहकर कडून येणारी स्कुटी व नागपूर कडून मेहकर कडे जाणारा आयशर क्र. MH04 GR 0867यांच्या मध्ये लांडे वाडी फाटयाजवळ अपघात होऊन यामधे स्कुटी स्वार तरुणी वैष्णवी किरण चंदनशिवे हिला डोक्याला मार लागल्याने जागीच ठार झाली.
सदर महीला ही ग्रामीण कुटा फायनान्स मध्ये काम करत असल्याने सकाळी च वसुली साठी जात असल्याचे समजते .सदर तरुणी ही मेहकर येथे अण्णा भाऊ साठे नगर ला राहते .
सदर अपघाताची माहिती मिळताच डोणगाव पोलीस स्टेशन चे वाहतूक पोलीस हर्ष सहगल व पोलीस मित्र रहीम खान हे ताबडतोब रवाना झाले तर आयशर चालकाला ताब्यात घेऊन आयशर डोणगाव पोलीस स्टेशन ला लावण्यात आले आहे. व्रृत लिहीपर्यंत डोणगाव पोलीस स्टेशन ला कोणताही गुन्हा नोंद झाला नव्हता.