spot_img

विट भट्टी वरील टिप्पर व जड वाहतूक धारकांनी जानेफळ बायपास चा वापर करावा अन्यथा कारवाई ला सामोरे जा | जानेफळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार आजीनाथ मोरे यांनी काढले फर्मान

मेहकर: (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)
जानेफळ येथील बायपास चा वापर न करणाऱ्या 85 वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करून 64,500 दंड वसूल करण्यात आला असल्याने वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन धारकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस स्टेशन जानेफळ अंतर्गत जानेफळ शहरांमधून मेहकर ते खामगाव शेगाव असा मुख्य रस्ता जातो.

त्यामुळे बऱ्याच चार चाकी वाहनांची वर्दळ असते त्यामुळे जानेफळ येथील गजानन महाराज चौक मेहकर बायपास ते निंबा फाटा पर्यंत बायपास रस्ता तयार करण्यात आलेला आहे व बायपास चा वापर करणे बाबत नामनिर्देश फलक लावण्यात आलेले आहेत तरीसुद्धा बरेच मालवाहतूक करणारे वाहतूक धारक जानेफळ गावातील मुख्य रस्त्याने जातात त्यामुळे जानेफळ बस स्टॅन्ड मुख्य बाजारपेठ व रमाई चौक जानेफळ येथे वाहनांची गर्दी होऊन रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याची बाब आमच्या निदर्शनास आली असल्याने या कृतीला आळा बसावा म्हणून दिनांक 1 जानेवारी 2024 ते आज पर्यंत चालू वर्षी जानेफळ बायपासचा वापर न करता जानेफळ शहरातून जड वाहतूक करणाऱ्या एकूण 85 वाहनांवर कार्यवाही करून त्यांचे कडून एकूण 64,500 दंड वसूल करण्यात आलेला आहे.

पोलीस स्टेशन जानेफळ करून मेहकर तालुक्यातील सर्व जड वाहन वाहतूक मालक चालक व संघटनांना याद्वारे आवाहन करण्यात येते की जानेफळ गावातून जड वाहनाने प्रवेश न करता बायपास मार्गाचा वापर करावा व जानेफळ शहरातील ट्राफिक नियंत्रणात आणावी याकरिता पोलीस प्रशासनात सहकार्य करावे ,
उपरोक्त कामगिरी ही उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजिनाथ मोरे, वाहतूक पोलीस प्रशांत आरसाडे व लक्ष्मण पिटकर यांनी पार पाडली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या