spot_img

मेहकर ते चानी मार्गे अकोला बस सेवा सुरु आगार व्यवस्थापक हर्षल साबळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

मेहकर: (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा

मेहकर आगारातून मेहकर ते अकोला हि बस सेवा काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आली होती. अकोला जाणाऱ्या नागरिकांना फार त्रास होत होता पण् मेहकर आगाराचे प्रमुख हर्षल साबळे यांनी पुढाकार घेऊन हि बस सेवा सुरु केल्याने नागरिकांनी फोनद्वारे अभिनंदन केले आहे.

सकाळी मेहकर ते चानी मार्गे अकोला हि बस सेवा मेहकर आगारातून काही दिवसांपूर्वी बंद करण्यात आली होती. सकाळी मेहकर वरुन ६:३० वाजता निघणारी बस वर खेड्यातील नागरिक अकोला येथे दवाखान्यात, शाळेतील विद्यार्थी, व इतर नागरिक प्रवास करत असतात. पण् बस सेवा बंद करुन नागरिकांची तारांबळ उडाली होती.

खासगी प्रवास करुन नाहक त्रास होत होता. पण् काही नागरिकांनी फोनद्वारे व प्रत्यक्ष भेटून मेहकर आगाराचे हर्षल साबळे यांना विनंती केली की मेहकर ते चानी मार्गे अकोला हि बस सेवा पूर्ववत सुरू करावी अशी मागणी केली असता आगारप्रमुख हर्षल साबळे यांनी ४ डिसेंबर ला हि बस सेवा सुरु केल्याने नागरिकांची गैरसोय थांबवली. त्यामुळे आगार प्रमुख हर्षल साबळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव नागरिक करत आहेत.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या