मेहकर: (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)
घाटनांद्रा फाट्यावर अपघाताचे प्रमाण वाढले असून चार दिवसात चार अपघात झाले आहे. एकाच ठिकाणी दोन जणांचा जीव गमवावे लागल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. वळण मार्ग हा धोक्याचा बनला असून किती जीव गमवावे लागतील याचा नेम नाही. त्यासाठी तातडीने गतिरोधक बसविण्याची मागणी जोर धरत आहे.
मेहकर तालुक्यातील घाटनांद्रा फाट्यावर 27 तारखेला रात्री मलकापूर पांगरा येथील बोलेरो पिकअप वडाच्या झाडावर आदळून एकजण ठार झाल्याची घटना घडली होती. यामध्ये दिगंबर रामभाऊ चवरे हा जागीच ठार झाला होता. दुसऱ्या दिवशी 28 तारखेला देऊळगाव साकरशा येथील वीट भट्टी वरील कामगार या ठिकाणी पल्सर गाडी घेऊन जखमी झाला होता.
त्याला सुद्धा डोक्याला व पायाला मार लागला असल्याने तो सुद्धा दवाखान्यात भरती आहे. तिसरा अपघात हा ड्रायव्हरला डुलकी लागल्याने आयशर वाहन संगम फाट्यावर आडवे झाले होते. यामध्ये सुद्धा ड्रायव्हरच्या हाताला मार लागला असुन क्लीनर थोडक्यात बचावला. व चौथा अपघात हा जानेफळ वरून घाटनांद्रा फाट्यावर विठ्ठल दिनकर ताकपिरे , भागवत उत्तम जवंजाळ, व संतोष विठोबा खिस्ते सर्व राहणार उबाळवाडी शिंदी तालुका जाफराबाद जिल्हा जालना येथे तिघे जण जोरात येऊन घाटनांद्रा फाट्यावर वळण मार्गावर पडले .
जवळ असणार्या लोखंडी अँगल वाकून मोटरसायकल अडकलेली आहे व शेवटी बसणारा संतोष विठोबा खिस्ते हा जोरात जाऊन टेबल जाऊन व डोक्याला मार लागल्याने मेहकर येथे ग्रामीण रुग्णालय मध्ये भरती करण्यात आले परंतु वैद्यकीय अधिकारी प्रगती पाटील यांनी तपासणी करून संतोष खिस्ते ला मृत घोषित केले व जाणेफळ पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.
चार दिवसात दोन जणांचा मृत्यू झाल्याने घाटनांद्रा फाटा हा अपघाताचे केंद्रबंदू बनले आहे त्यामुळे संबंधित अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन गतिरोधक बसवावे अशी मागणी जोर धरत आहे.