डोणगाव: (सचिन गाभणे. रोखठोक न्युज वृत्तसेवा)
डोणगाव येथील रहिवासी अक्षय ज्ञानेश्वर पळसकर (३०) याचा जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात वाकोडी येथे २८ नोव्हेंबरच्या रात्री साडेआठ वाजता अपघाती मृत्यू झाला.यामुळे हळहळ व्यक्त होत आहे. व्यावसायिक ज्ञानेश्वर पळसकर यांचा मुलगा अक्षय पळसकर शेती व नर्सरी व्यवसाय करीत होता.
तसेच त्याचा ऑटो मोबाइलचाही व्यवसाय होता. अक्षय कामानिमित्त जळगाव खान्देश येथे जात होता. जामनेर तालुक्यातील वाकोडी गावाजवळ समोरील वाहनाच्या प्रकाशानाने दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला सार्वजनिक शौचालयावर आदळला. त्याचा जागीच मृत्यू झाला. अक्षयच्या पश्चात पत्नी दोन मुले, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. या घटनेने डोणगाववर शोककळा पसरली आहे.