spot_img

ड्रायव्हरला डुलकी लागून मोठे आयशर रस्त्यावर पलटी , ड्रायव्हर जखमी

मेहकर: (अनिल मंजुळकर.रोखठोक न्युज वृत्तसेवा)

मेहकर ते शेगाव पालखी महामार्गावर असणाऱ्या संगम फाटा गोमेधर येथे अपघातात वाढ होत आहे. आज सकाळी मोठे आयशर पलटी होऊन ड्रायव्हर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
अकोला येथुन मालभरुण मेहकर कडे जात असतानी संगमफाटयावर ड्रायव्हरला डुलकी लागून एकदम ब्रेक दाबल्याने आयशर रस्त्यावर संपूर्ण आडवे झाले. रस्त्यामध्ये कोणतेच वाहन आले नसल्यामुळे अनर्थ टळला.

समोर येणारी मोटर सायकल वाल्याने आपले वाहन उभे करून आखो देखा आयशर पलटी होताना पाहिले. आयशर जोरात फरफटत रस्त्यावर आडवे झाले. ड्रायव्हर व कंडक्टरला गाडीच्या बाहेर सुखरूप काढण्यात आले.

फक्त ड्रायव्हरच्या हाताला लागले असल्याने जानेफळ येथे दवाखान्यात भरती करण्यात आले. या दोन-तीन दिवसात घाटनांद्रा फाट्यावर सुद्धा अपघात होऊन एक ठार झाल्याची घटना रात्री ला घडली होती. वाहने जोरात येऊन घाटनांद्रा फाट्यावर वळणावर अपघात जास्त होत असतात. त्यामुळे संगमफाटयावर गतिरोधक बसविण्याची मागणी जोर धरत आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या