spot_img

देऊळगाव माळी येथे गाईचे डोहाळे जेवण जिल्ह्यात पहिल्यांदाच करण्यात आले गाईचे डोहाळे जेवण दे.माळी येथील मगर परिवाराचा स्तुत्य उपक्रम

डोणगाव: (सचिन गाभणे. रोखठोक न्युज वृत्तसेवा)

आपण प्राणीमात्रावर दया करायला हवी, त्यांना माणसाप्रमाणे जीव लावायला हवा, जिवापाड जपायला हवं! असं फक्त म्हणतच असतो किंवा फक्त ते पुस्तकातच राहतं. परंतु देऊळगाव माळी तालुका मेहकर येथील मगर परिवाराने हे प्रत्यक्षात उतरवले आहे.

आपण डोहाळे जेवण हे प्रत्येक घरात करतो, घरात येणाऱ्या नवीन पाहुण्याची, व्यक्तीचे अतिशय धुमधडाक्यात चाहूल लागताच स्वागत करतो. असेच डोहाळे जेवण मगर परिवाराने चक्क गोमातेचे केले. कोणीच जिल्ह्यात अजूनही गोमातेचे डोहाळे जेवण केले नाही. परंतु मगर परिवाराने अगदी आपल्या कुटुंबीयातील सदस्य प्रमाणे या गोमातेचे अतिशय उत्साहात व आनंदात डोहाळे जेवण केले.

परिसरातील शेतकरी, माता-भगिनी यांना बोलावून गोमातेचे डोहाळे जेवण करून मुक्या प्राण्यांवर सुद्धा आपण माणसाप्रमाणे प्रेम करावे. त्यांना सुद्धा माणसाप्रमाणे वागणूक द्यावी. अशा प्रकारचे आदर्श उत्तम उदाहरण पांडुरंग तुळशीदास मगर, वसंता मगर, गणेश मगर, व मगर परिवाराने समस्त महाराष्ट्रातील जनतेला दिले आहे. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या