मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)
डोणगांव येथे सध्या अवैध गौण खनिज माफीयांनी खुले आम अवैध गौण खनिज वाहतूक रात्रीस चालू केली असून सदर माफीया दररोज हजारो रुपयांचा महसूल डूबवून शासनाला चुना लावीत असताना महसूल प्रशासनाला कुणकुणही नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सध्या विधानसभा निवडणुकीची धांदल संपली असून आता अवैध धंदे वाल्यांनी आपले व्यवसाय जोमात सुरू केले आहे. डोणगांव येथे सर्रास रात्रीच्या वेळेस सम्रृध्दी महामार्गाशेजारी असणार्या खड्ड्यातून अवैध मुरूम खोदून खुलेआम रात्रभर डोणगांव व परीसरात ट्रॅक्टर चालू असतात एवढेच नव्हे तर अवैध रेती चे टिप्पर ही महामार्गावर दिसून येत आहे.
याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने सर्रास हे अवैध वाहतूक दिसून येत आहे एवढेच नव्हे तर स्थानिक पोलीस स्टेशन समोरून रात्रीस अवैध रेती टिप्पर तसेच ट्रॅक्टर जात असल्याने पोलीस प्रशासन ही बघ्यांची भुमिका घेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे तर अवैध रेती व मुरूम वाहतूक करणारे मात्र शासनाचा लाखो रुपयांचा कर बुडवून गब्बर होत असल्याचा बोलले जात आहे.
डोणगांव येथे महसुल विभागाने ईतर भागातील तलाठी व पोलीस यांचे पथक तयार करून राञीला येणारे अवैध रेती टिप्पर व मुरुम ट्रॅक्टर तसेच सम्रृध्दी महामार्गाच्या बाजूने असलेल्या खड्ड्यात पाळत ठेवली तर मोठी कारवाई होऊन पायबंद बसू शकतो. एवढे मात्र खरे.