मेहकर येथील पोस्ट ऑफिसचा दरवाजा तोडून चोरटे शिरले आत  चोरी करण्याचा प्रयत्न; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा 

मेहकर : (अनिल मंजुळकर.रोखठोक न्युज वृत्तसेवा)
पोस्ट ऑफिसच्या मागील दरवाजाची लाकडी फळी तोडून अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. कार्यालयातील साहित्य अस्तावस्थ करीत चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मेहकर शहरातील पोस्ट ऑफिस कार्यालयात 27 नोव्हेंबरच्या उत्तररात्री घडली. याप्रकरणी मेहकर पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेची माहिती उपडाक अमित अहिर यांनी मेहकर पोलिसांना दिली. त्यानुसार, अमित अहिर हे मागील तीन वर्षांपासून मेहकर येथील डाक विभागात कार्यरत आहेत. मंगळवारी नेहमीप्रमाणे ते कर्तव्यावर होते.

कामे आटोपल्यानंतर सायंकाळी पोस्ट ऑफिस बंद करून त्यांनी कॅशबॅग पोलीस स्थानकात जमा केली, त्यानंतर सर्व कर्मचारी आपपल्या घरी निघून गेले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी पोस्ट ऑफिस उघडण्याकरिता अमित अहिर हे सहकारी कर्मचाऱ्यांसोबत सकाळी हजर झाले.

यावेळी पोस्टऑफिस उघडून बघितले असता त्यांना कार्यालयातील साहित्यांची नासधूस झाल्याचे दिसून आले, कार्यालयातील तिजोरी उघडण्यात आल्याचे यावेळी त्यांना समजले. मात्र, त्यामधील साहित्य जसेच्या तसेच ठेवल्याचे दिसून आले. इतकेच नाही तर, सीसीटीव्ही कॅमेरे हलवण्यात आल्याचे लक्षात आले.

दरम्यान, अमित अहिर यांनी बारकाईने बघितले असता कार्यालयाच्या मागील दरवाजाची लाकडी फळी तुटलेली दिसली. चोरीच्या उद्देशाने अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला असे. तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या

WhatsApp Group