spot_img

मेहकर येथील व्यापारी व्यावसायिकांचा आमदार संजय रायमुलकर यांना एकमुखी पाठिंबा विक्रमी मतदान करण्याचे सुरेश मुंदडा यांचे आवाहन

मेहकर: (हर्षल गायकवाड. रोखठोक न्युज वृत्तसेवा)

आमदार संजय रायमुलकर आणि शिवसेनेने सतत मेहकर शहरातील व्यापारी व्यावसायिक बांधवांना सहकार्य केलेले असून त्यांनाच मोठ्या संख्येने मतदान करण्याचा निर्णय येथे पार पडलेल्या व्यावसायिकांच्या बैठकीत घेण्यात आला. महायुतीचे उमेदवार संजय रायमुलकर यांना पाठिंबा व्यक्त करण्यासाठी शहरातील व्यापारी व्यावसायिक यांची बैठक व्यापारी संघटनेने आयोजित केले होती. बैठकीला शहरातील सर्व प्रकारचे व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुरेश मुंदडा यांनी आपल्या भाषणात सांगितले की, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी ,कार्यकर्ते यांच्याकडून शहरातील व्यापारी बांधवांना सातत्याने सहकार्य मिळाले असून या सर्व घटकांना कुठलीही अडचण कधीही येऊ दिली नाही, त्यामुळे व्यापारी बांधव संजय रायमुलकर यांना एकमुखी पाठिंबा जाहीर करत आहेत. रायमुलकर यांनी शहरात सर्व नागरिकांच्या सोयीसाठी ९०० कोटींची विकास कामे केलेली असून हा एक विक्रम आहे. सर्व समाज घटकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.

अहोरात्र ते जनतेच्या हितासाठी झटत असतात. म्हणून आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभे आहोत, असे यावेळी बोलताना उदय सावजी म्हणाले. बैठकीत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर, भाजपचे डॉ. सुभाष लोहिया, जयचंदजी बाठीया, अख्तर चुडीवाले आदींची भाषणे झाली. पेनटाकळी पाणी वापर महासंघाला देशातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला, त्याबद्दल संस्थेचे महेश गट्टानी, राजेंद्र गाडेकर यांचा व्यापारी बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर, डॉ. प्रमोद जाधव, डॉ नंदकुमार उमाळकर,शंकर अग्रवाल ,विवेक जोशी ,ललित इण्णनी ,राजू इरतकर, मंगेश वीज, उदय सोनी, गोपाल मोदानी, मुन्ना महाराज दायमा, तारू मेमन ,दिवाकर मेहकरकर, बबलू मुंदडा ,सुरेश हेडा, रवी डहाके, योगेश काबरा, अग्रवाल ,वैभव सावजी, सतीश हेडा, विजय मुंदडा, विनोद मानधना,राजन महाजन, विशाल काबरा ,संतोष नाईकवाडे, मनीष सावजी ,सिद्धेश व्यास ,दीपक जवंजाळ, संतोष अवस्थी ,शंकर चनखोरे , आहेत आनंद शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक फिरोज शहा यांनी केले तर सूत्रसंचालन जयचंद बाठीया यांनी केले व सुमित धोटे यांनी आभार मानले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या