मेहकर: (हर्षल गायकवाड रोखठोक न्युज वृत्तसेवा)
रायमुलकरांच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराने भ्रष्ट मार्गाने पैसा कमावलेला असून हा माणूस अतिशय बदमाश आणि बेईमान आहे. चळवळीतल्या कार्यकर्त्यांना त्रास देणारा आहे .त्यांचे पंख छाटणारा आहे. त्याच्यापासून सावध राहा. जनतेची अहोरात्र सेवा करणाऱ्या संजय रायमुलकरांना विक्रमी मतदान करत विजयी करा, असे आवाहन समतेचे निळे वादळ संघटनेचे संस्थापक भाई अशांत वानखेडे यांनी केले. महायुतीचे उमेदवार संजय रायमुलकर यांच्या प्रचारार्थ आज मेहकर येथे मागासवर्गीय मतदारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. प्रचंड संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव ,समतेचे निळे वादळ चे भाई अशांत वानखेडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे गिरधर पाटील, भारतीय जनता पक्षाचे डॉ. सुभाष लोहिया, मंदाकिनीताई कंकाळ प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते . भाई कैलास सुकदाने ,माजी नगरसेवक मनोज जाधव यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. आपल्या भाषणात भाई अशांत वानखेडे पुढे म्हणाले, की मागासवर्गीय समाजासाठी सिद्धार्थ खरात ही व्यक्ती अतिशय कृतघ्न आहे वाम मार्गाने त्यांनी प्रचंड संपत्ती जमा केली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते, की देशात जातीसाठी माती खाणारी माणसे पुष्कळ मिळतील परंतु तत्त्वासाठी जातीला मोठा माती देऊन समता निर्माण करणारी माणसे हवी आहेत.
यावेळी त्यांनी उदाहरण दिले की, वाघाच्या पाठीवर बकरी चढून बसली आहे आणि वाघ फिरतो आहे घारीने हे चित्र वरून पाहिले तिला आश्चर्य वाटले तिला नंतर घार जमिनीवर आली तिला नंतर कळले की या वाघाची माय हरवली तेव्हापासून बकरीने दूध पाजून त्याला मोठे केले ते मायलेखा सारखे वागत होते उपकाराची फेड उपकाराने अशी केली जाते एकदा एक उंदीर पावसात कुडकडत होता असे घारीला दिसले तिला दया आली घारा आकाशातून खाली आली तिने उंदराला रात्रभर आपल्या पंखाखाली घेतले पण सकाळी पाहतो तर घारीला उडता येत नव्हते कारण ज्या उंदराला तिने सहकार्य केले त्यानेच तिचे पंख रात्रभर कुरतडून टाकले होते.
अशाच प्रकारातला माणूस सिद्धार्थ खरात आहे म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवू नका संजय रामुलकर यांनी मागासवर्गीय वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे केले असून त्यांना सहकार्य केले आहे त्यामुळे त्यांना विक्रमी मतांनी विजयी करा असे टाळ्यांच्या कडकडाटात त्यांनी आवाहन केले. आपल्या भाषणात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की, साठ वर्ष काँग्रेसने दलितांच्या मताचा सत्तेसाठी वापर केला, या देशाचे श्रेष्ठ संविधान ज्यांनी तयार केले त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न देण्यासाठी काँग्रेसने सतत विरोध केला. भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा असलेले जनता दलाचे सरकार आले तेव्हा बाबासाहेबांना भारतरत्न किताब दिला गेला.
काँग्रेसने मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शिवडी मतदार संघात पराभूत केले. आंबेडकरांच्या विरोधात तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रचार केला. तसाच प्रकार भंडाऱ्यात घडला. तिथेही काँग्रेसने बाबासाहेबांना पराभूत केले. सगळ्यात मोठा बाबासाहेबांचा अपमान कोणी केला असेल तर तो काँग्रेसने केला. काँग्रेस हे जळते घर आहे ,असे बाबासाहेब म्हणायचे. मग तुम्ही जळत्या घरात कशाला उड्या मारता, असे उपस्थितांना जाधव यांनी विचारले.
लोकसभेच्या निवडणुकी वेळी भाजप संविधान बदलणार असा अपप्रचार केला गेला.
परंतु संविधान बदलण्याची ताकद कोणातही नाही. उलट पंतप्रधान मोदी यांनी जुन्या संसद भावनांच्या जागी नवी इमारत बांधून त्या इमारतीला संविधान भवन असे नाव दिले. लोकसभेत त्यांनी सांगितले की, बाबासाहेबांच्या संविधानामुळेच एक साधा चहा विकणारा या देशाचा पंतप्रधान झाला आहे. आमदार संजय रायमुलकर आणि मी मिळून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या माध्यमातून प्रचंड विकास निधी मेहकर लोणार तालुक्यात आणला आहे. यात दुर्लक्षित घटकांच्या वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे करण्यात आलेली आहेत. आम्ही आधीही मागासवर्गीय समाजाच्या सोबत होतो, आहोत आणि पुढेही राहणार आहोत,Q असे प्रतापराव जाधव म्हणाले.
आपल्या भाषणात भाई कैलास सुकदाने म्हणाले की, विरोधक मागासवर्गीय समाजाची दिशाभूल करत आहेत .त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वाधिक त्रास, मनस्ताप जर कोणी दिला असेल तर तो काँग्रेसने दिलेला आहे .त्यामुळे या गोष्टीची जाणीव ठेवून आणि मागासवर्गीय समाजासाठी संजय रायमुलकर यांनी केलेले कार्य लक्षात घेऊन त्यांना विजयी करण्यासाठी धनुष्यबाण या निशाणी उच्च बटन दाबून त्यांना विक्रमी मतांनी विजयी करावे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गिरधर पाटील यांनी आपल्या भाषणातून विरोधी उमेदवाराच्या बाबत सांगितले की, एकादशीच्या दिवशी मांसाहार करणारा हा माणूस आहे. त्याला वारकरी संप्रदायाची विणा गळ्यात लटकवून फिरण्याचा कोणताही अधिकार नाही .तो अधिकार केवळ वारकरी संप्रदायाचा आहे. म्हणून त्याने विना गळ्यात घेऊन फिरणे हा वारकरी संप्रदायाचा अपमान आहे. यावेळी आशाताई झोरे, डॉ. सुभाष लोहिया यांची भाषणे झाली.
मेळाव्याला शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर, शहर प्रमुख जयचंद बाठीया, समाधान साठे ,मनोज जाधव, पिंटू सुरजन, तौफिक कुरेशी ,अख्तर चुडीवाले ,हनीफ गवळी ,दुर्गाताई शिरे, सीमा हिवाळे, गणेश भालेराव ,सुनिता मोरे ,अक्काताई गायकवाड, ज्योती तुरेराव, सविता गायकवाड ,तुषार नेमाडे ,संजय जाधव ,राहुल माने, रवी जाधव ,आकाश भालेराव, किरण महाजन ,समाधान गवई, अश्रू मानवतकर, प्रभाकर आवारे ,अनिल नेमाडे, राजू मानवतकर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाई सुखदाने यांनी केले.