मेहकर: (हर्षल गायकवाड रोखठोक न्युज वृत्तसेवा)
सोनाटी येथे मल्हारी मार्तंड खंडोबा संस्थांनच्या सभागृहात धनगर समाजाचा भव्य मेळावा काल ता. १५ रोजी पार पडला. समाज बांधवांची विक्रमी उपस्थिती होती .यावेळी समाजाचे मुरलीधर लांबाडे, विष्णू साखरे, लखन करे, एकनाथ खरात यांनी आपल्या भाषणातून जाहीर केले. की, आमदार संजय रायमुलकर यांनी आजवर अनेक गावांमध्ये समाज वस्तीत मोठ्या प्रमाणावर विकास कामे केलेली आहेत. मल्हारी मार्तंड संस्थांनसाठी त्यांनी तीन कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे आम्ही सर्व समाज बांधव आमदार रायमुलकर यांच्या पाठीशी आहोत, अशी घोषणा त्यांनी केली.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे अध्यक्ष माधवराव जाधव होते. यावेळी विजयराव जाधव, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव, माजी जि. प. सभापती राजेंद्र पळसकर, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख समाधान साबळे, विष्णू साखरे , संस्थांनचे उपाध्यक्ष पंडितराव हुले, डॉ. अनिल गायकवाड,गजानन बोरकर ,कुंडलिक गायकवाड, योगेश फुके ,जानकीराम गायकवाड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
संस्थांनला भरीव निधी मंजूर करून दिल्याबद्दल यावेळी संजय रायमुलकर यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला. मल्हारी मार्तंड खंडोबांचे आमदार रायमुलकर यांनी पूजन केले. आपल्या भाषणात मार्गदर्शन करताना आमदार रायमुलकर म्हणाले की, मी जातीभेद न करणारा माणूस आहे .सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी सातत्याने झटत राहणे हेच मी माझे कर्तव्य समजतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार आम्ही अधिक प्रमाणात समाजकारण करण्याचे काम करतो.
मतदार संघातील जसे इतर समाजांच्या घटकांसाठी विविध विकास कामे केली, त्याप्रमाणेच धनगर समाज बांधवांसाठी मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहेत .भविष्यातही मी आपल्या सोबत असून आवश्यक ते सर्व सहकार्य करेन, असेही आमदार संजय रायमुलकर म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने सर्व जाती धर्माच्या आर्थिक पुनरुत्थानासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केलेली असून मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धताही करून देण्यात आलेली आहे. सर्व घटकांच्या हितासाठी काम करणारे महायुती सरकार असून विकास कामांचा धडाका पुढेही सुरू ठेवण्यासाठी मला मतदानाच्या माध्यमातून सहकार्य करावे असेही ते म्हणाले.
यावेळी माधवराव जाधव ,डॉ. अनिल गायकवाड, मुरलीधर लांभाडे, अश्रुजी फुके, विष्णू साखरे ,आशाताई झोरे आदींची भाषणे झाली. मिळवायला समाजातील महिला पुरुषांची प्रचंड गर्दी झाली होती. भाजपचे शेषराव तोतरे, रवींद्र कष्टे , आणि सुभाष खो, प्रकाश खोडके, पंढरीनाथ फुके, गजानन कातडे ,मुरलीधर लांभाडे ,संदीप गायकवाड ,अश्रुजी फुके ,ज्ञानेश्वर साखरे, दीपक साखरे, धनंजय रौंदळे ,ओंकार गावंडे ,अनिल ढवळे, अभिमन्यू साखरे, विकास गोरे ,विलास काळदाते ,लखन करे आदींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश मगर यांनी केले तर आभार मुरलीधर लांबाडे यांनी मांनले.