spot_img

विश्वकर्मा क्रांती दल बलुतेदार ओबीसी समाज राज्यव्यापी संघटनेचा महायुतीचे संजय रायमुलकर यांना पाठिंबा

मेहकर ( हर्षल गायकवाड. रोखठोक न्युज वृत्तसेवा )

महाराष्ट्र विश्वकर्मा महासभेशी संलग्नित विश्वकर्मा क्रांती दल, बलुतेदार ,मायक्रो ओबीसी समाज राज्यव्यापी संघटन यांनी राज्यभरातील महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला असून संजय रायमुलकर यांना पाठिंबाचे पत्र संघटनेने दिले आहे.

सदर संघटना ही सामाजिक दृष्ट्या राज्यव्यापी महत्त्वाची संघटना आहे. संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब पांचाळ, सचिव माधव पांचाळ ,राज्य उपाध्यक्ष संतोष विश्वकर्मा, त्याचप्रमाणे अवधेश विश्वकर्मा, गणेश देवघरकर ,गुलाबराव भामरे, प्रवीण लाखेकर ,शुभम पांचाळ अशा कोकण, उत्तर महाराष्ट्र ,पश्चिम विदर्भ, मराठवाडा विभागाचे पदाधिकारी यांनी आज रायमुलकर यांची भेट घेऊन विश्वकर्मा क्रांती दलाचा पाठिंबा जाहीर केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने ओबीसींसाठी १९ टक्के आरक्षण कोट्याचे संरक्षण, ओबीसींसाठी क्रिमिलेयर उत्पन्न गटाच्या मर्यादेत १५ लाखापर्यंत वाढ ,ओबीसी विद्यार्थ्यांसाठी १४४ वसतीगृहांचे बांधकाम सुरू करणे , मागील ४० वर्षापासून प्रलंबित ओबीसी बलुतेदार, कारागिरांच्या सर्वांगीण विकास व आर्थिक सक्षमीकरणासाठी सुतार ,सोनार, लोहार ,न्हावी, कुंभार, गुरव, शिंपी, विणकर आदी समाज गटांसाठी आर्थिक विकास महामंडळे स्थापण्याचा महत्त्वाचा निर्णय घेऊन आर्थिक निधीची तरतूद केलेली आहे.

या पार्श्वभूमीवर ओबीसी समाज राज्यव्यापी संघटनेने हा पाठिंबा दिल्याचे पत्रात म्हटले आहे. कारागिरांच्या कौशल्याला सन्मान आणि आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासनाची प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना जाहीर केली आहे.

त्याबद्दल त्यांचे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संघटनेने आभार मानले आहेत. बलुतेदार मायक्रो ओपीसी समाजाने आमदार संजय रायमुलकर यांनाच सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहन प्रसिद्धी पत्रकात करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या