लोणार (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)
सख्खा भाऊ वर्षातून एकदा ओवाळल्यावर ओवाळणी देतो. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी लाडकी बहीण योजना आणलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुती सरकारने योजनेचे पाच महिन्यांचे पैसे एकाच वेळी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा केले. शेतकरी व इतर भावांनाही अनेक योजनांच्या माध्यमातून भरभरून दिले. परतफेड करण्यात महिला नेहमी पुढे असतात. लाडके भाऊ व लाडक्या बहिणींनो मतदान रुपी आशीर्वाद देऊन महायुतीचे सरकार पुन्हा आणा, असे आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंढे यांनी केले.
शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय रायमुलकर यांच्या प्रचारार्थ भाजपच्या स्टार प्रचारक, राष्ट्रीय सचिव व प्रवक्ता पंकजाताई मुंढे यांची जाहीर सभा आज लोणार येथे श्री मंगल कार्यालयात झाली. केंद्रीय आयुष, आरोग्य, कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. वंजारी बहुल गावांची संख्या लोणार तालुक्यात जास्त असल्याने सभेला विक्रमी गर्दी झाली होती. त्यांचे आगमन झाल्यानंतर मंठा चौफुली पासून सभास्थळापर्यंत बाईक रॅली काढून कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात पंकजाताईंचे स्वागत केले.
प्रारंभी बाळासाहेब ठाकरे, संत भगवान बाबा, छत्रपती शिवराय, गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्रकाशभाऊ मापारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा बळीराम मापारी, बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव ऋषिकेश जाधव, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर, तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर भगवानराव सुलताने शहर प्रमुख पांडुरंग सरकटे,जयचंद बाठीया, उपतालुकाप्रमुख समाधान साबळे, राजश्रीताई जाधव, रंजनाताई रायमुलकर भाजपचे भगवानराव सानप, ऍड. शिवाजी सानप, देशमुख बापू, विजय मापारी,ठोकळ महाराज,सारंग माळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे गिरधर पाटील व्यासपीठावरउपस्थित होते.
आपल्या भाषणात पंकजाताई मुंडे पुढे म्हणाल्या की, गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पोटी जन्माला आल्याचा मला अभिमान आहे. त्यांनी मला संस्कार आणि परंपरा जतन करण्याचे बाळकडू दिले आहेत. ज्या महापुरुषांचे आपण आज पूजन केले ते अतिशय बुद्धिमान आणि स्वाभिमानी होते. आपल्याला त्यांची थोर परंपरा लाभलेली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने शेतकरी,लाडक्या बहिणी आदी सर्वांसाठी मोठ्या प्रमाणावर योजना दिल्या. राज्याला स्वयंपूर्णतेकडे नेण्याचा सातत्याने प्रयत्न केला.पंतप्रधान मोदींनी पी एम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळवून दिला. गेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी खोट्या गोष्टी पसरवून भूलथापा देऊन लोकांची दिशाभूल केली. विरोधकांनी अपप्रचार केलेल्या गोष्टी घडल्या नाहीत. संविधान बदलले जाणार नाही तर संविधानाला अधिक सशक्त करण्याचा केंद्र आणि राज्य सरकारचा प्रयत्न आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, महायुती सरकारने सर्व घटकांना भरभरून दिले.आता आपण मतदानरुपी आशीर्वाद देऊन महायुतीचे सरकार पुन्हा आणावे. सर्वांनी हात वर करून आणि मूठ आवळून मला वचन द्या की, तुम्ही संजय रायमुलकर यांनाच मतदान कराल. उपस्थित सर्व महिला, पुरुष व युवकांनी हात वर करून मूठ आवळत पंकजाताईंच्या आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिला. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर यांनी आपल्या भाषणातून महायुती सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा सादर करत धनुष्यबाण चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले. प्रल्हादराव सुलताने, भगवानराव कोकाटे, संतोषभाऊ मापारी, प्रकाश पोफळे, नंदूभाऊ मापारी, नीरज रायमुलकर, समाधान साठे, राजीव तांबिले, बाबूसिंग जाधव, अंजलीताई गवळी, आशाताई झोरे महायुतीतील घटक पक्षांचे मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जितेंद्र घुले यांनी केले.