spot_img

वंचितच्या सिलेंडरचा शेतकरी क्रांतीकारी संघटनेने काढून घेतला गॅस.. मतदारसंघात चर्चेला उधाण वंचित च्या बॅनर वरून रविकांत तुपकर आणि टाले यांचा फोटो गायब ! वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा नाही , लवकरच पाठिंबा जाहीर करु – डॉ. टाले

मेहकर:-(अनिल मंजुळकर)
मेहकर विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीत वंचित मध्ये आयत्या बिळावर नागोबा होऊन बसलेले उमेदवारांचे पती,डोणगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष ऋषांक चव्हाण यांना दिवसाढवळ्या आमदार झाल्याचे स्वप्न पडत आहेत त्यामुळे ते आपण आजच आमदार झालो आहोत ह्या तो-यात वागत आहेत. परंतु शेतकरी क्रांती संघटनेने आपला पाठिंबा काढून घेतल्यामुळे मतदारसंघात एकच खळबळ उडाली आहे.
सोमवारी बहुजन वंचितच्या उमेदवार ऋतुजा ऋषांक चव्हाण यांच्या प्रचारासाठी साठी वंचितचे सर्वेसर्वा माजी खासदार बाळासाहेब आंबेडकर यांची सभा आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे या सभेला संबोधित करतांना बाळासाहेब आंबेडकर यांनी भाषणाच्या शेवटी उमेदवाराचे नाव न घेता गॅस सिलेंडर समोरील बटन दाबून विजयी करा असे आवाहन केले आणि गंमत म्हणजे कुणाला मतदान करायचे हे सांगण्यास बाळासाहेब विसरुन गेले. असतील बाळासाहेबांचे भाषण चालू असतांनाच काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी भाषणाच्या मध्ये टाळ्या वाजवल्या असता बाळासाहेबांनी आपण असेच वेड्यासारखे वागता म्हणून आपल्यावर वाईट वेळ आल्याचे सांगितले.

आपली लढाई ही ओबीसींचे आरक्षण वाचवण्यासाठी असल्याचे सांगून त्यासाठी विधानसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले यावेळी बोलतांना माजी खासदार बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की ,मी पोलीसांना आवाहन करतो की मेहकर विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीत विरोधकांकडून वारेमाप पैसा खर्च केला जात असून मतदारसंघात ४० कोटी रुपये आलेले आहेत त्यावर धाडी टाकून ते पैसे आपापसात वाटून घेण्याचा सल्ला बाळासाहेब आंबेडकरांनी पोलीस कर्मचाऱ्यांना दिला.
विशेष म्हणजे या सभेसाठी मेहकर शहरातील वस्तीतुन स्रिया व पुरुषांना रोजंदारीवर आणल्याची चर्चा सभास्थळी चर्चिल्या जात होती.दुसरी महत्वाची बाब म्हणजे वंचितांच्या अधिकृत उमेदवार डॉ ऋतुजा ऋषांक चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेतकरी क्रांतीकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर येणार असल्याची वल्गना केली होती परंतु रविकांत तुपकर आलेच नव्हते तसेच आज बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेमध्ये रविकांत तुपकर शेतकरी क्रांतीकारी संघटनेचा पाठींबा जाहीर करणार असल्याची अफवा उमेदवार पती ऋषांक ओंकार चव्हाण यांनी पसरवली होती.

 

प्रत्यक्षात मात्र ना रविकांत तुपकर आले आणि त्यांचे मेहकर विधानसभा मतदारसंघातील शिलेदार डॉ ज्ञानेश्वर टाले हे सुद्धा आले नाहीत त्यामुळे एकंदरीत स्वतः महायुतीचे उमेदवार डॉ संजय रायमुलकर यांच्याशी स्पर्धा असल्याचे भासविणारे ऋषांक चव्हाण यांच्या प्रचारातील हवा निघून गेली. कुठेच प्रचारात आघाडी नसून फक्त खोट्या नाटया बातम्या पैसे देऊन प्रसिद्ध करुन घेतल्या असल्याचा आरोप सुध्दा जनमानसात केला जात आहे.
वंचितांच्या गॅस सिलेंडर मध्ये महायुतीने गॅस भरल्याची चर्चा मेहकर लोणार विधानसभा मतदारसंघात जोरदारपणे चर्चिल्या जात असल्याने यंदाच्या निवडणुकीत बहुजन समाजासह मागासवर्गीय समाजाची मते वंचितच्या सिलेंडरकडे जाणार नसल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
आमचा पाठिंबा वंचित ला नाही.
सोमवारला वंचित प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या मध्ये क्रांतिकारी संघटनेचे बॅनर कुठेच आढळले नाही. या सभेला डॉक्टर टाले यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी स्पष्ट सांगितले की आमचा वंचितला पाठिंबा नाही. आम्ही लवकरच पाठिंबा जाहीर करणार असल्याचे डॉक्टर टाले सांगत होते. क्रांतिकारी संघटनेने आपला पाठिंबा काढून घेतल्यामुळे वंचितच्या उमेदवारांची दमछाक होणार असल्याचे बोलल्या जात आहे ‌.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या