spot_img

जानेफळ पोलीस स्टेशनच्या वतीने 108 गुन्हेगारांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता मुंबई पोलीस कायदा अन्वये कठोर प्रतिबंधक कारवाई

जानेफळ (गणेश ताकतोडे. रोखठोक न्युज वृत्तसेवा )

भयमुक्त वातावरणामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पाडावी व निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या उद्देशाने पोलीस स्टेशन जानेफळ हद्दीतील सराईत गुन्हेगार, उनाडखोर इसम, सराईत दारू विक्रेते, सोशल मीडियावर अफवा पसरविणारे इत्यादी 108 गुन्हेगारांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता तसेच मुंबई पोलीस कायदा अन्वये कठोर प्रतिबंधक कारवाई पोलीस स्टेशन जानेफळ हद्दीत विधानसभा निवडणूक 2024 शांततेत पार पाडावी तसेच भयमुक्त वातावरणामध्ये निवडणुका पार पाडाव्यात व त्यादरम्यान कुठल्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसरे साहेब यांनी सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन जानेफळ येथील अभिलेखा वरील मागील 10 वर्षांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये एकूण 108 मुख्य गुन्हेगारांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 126 व कलम 129 अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली असून सदर गुन्हेगारांचे कार्यकारी दंडाधिकारी यांचे कडून शांतता ठेवण्यासाठीचे बॉण्ड घेण्यात आलेले आहेत. 10 सराईत गुन्हेगारांचे कलम 56 व 57 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये तडीपार प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी मेहकर यांना सादर करण्यात आलेले आहेत.

तसेच अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या 05 सराईत गुन्हेगारांवर कलम 93 महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. पोलीस स्टेशन हद्दीतील समाजविघातक कृत्य करणारे, सोशल मीडियावर अफवा पसरविणारे इसम ओळखून देऊळगाव साखरशा येथील 1, सोनार गव्हाण येथील 1, जानेफळ येथील एक व कळंबेश्वर येथील तीन इसमावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.

हद्दीतील 25 टवाळखोर यांच्यावर मतदान दिवशी मतदानाचा हक्क राखीव ठेवून मतदानाच्या दिवशी 1 दिवसाकरिता हद्दीत प्रवेशास निर्बंध रहावा या करिता कलम 163 BNSS प्रमाणे प्रस्ताव तयार करून उपविभागीय दंडाधिकारी मेहकर यांना सादर करण्यात आलेले आहेत.

तसेच आचारसंहिता काळात नाकाबंदी व कोंबिंग ऑपरेशन राबवून एक इसम हातात तलवार घेऊन फिरत असल्याने त्याच्यावर शस्त्र अधिनियमाप्रमाणे कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

आचारसंहिता काळात बेकायदेशीर दारू विक्रीचे २९ गुन्हे दाखल करण्यात आले असून ८६०००/ रू किमतीची देशी, विदेशी, गावठी हाथभट्टीची दारू जप्त करण्यात आली आहे

गुन्हेगारी प्रवृत्तीवर पोलिसांची करडी नजर असून कोणीही शांतता बिघडवू नये याकरिता पोलीस दल आवश्यक ती कायदेशीर कारवाई करत आहे. सोशल मीडियावर अफवा बसविणाऱ्या इसमा बाबत तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती द्यावी. असे आवाहन करण्यात येते.

उपरोक्त कारवाई बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री विश्व पानसरे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रदीप पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन जानेफळ चे ठाणेदार सपोनी आजिनाथ मोरे, PSI राहुल चव्हाण, ASI अरविंद चव्हाण, HC नरेंद्र अंभोरे, मोहन सावंत, पंढरी काकड, NPC लक्ष्मण पिटकर, PC प्रदीप सौभागे, अमोल अंभोरे, विनोद फुफटे, गणेश शिंदे, दीपक पाटील यांनी पार पाडली

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या