spot_img

ग्रामदेवता माता जगदंबेला नारळ फोडून आ. डॉ. संजय रायमूलकर यांच्या प्रचाराला जानेफळमध्ये सुरुवात……… एक लाखाहून अधिक लिड देण्यासाठी कार्यकर्ते मतदारसंघात फिरणार – विश्वासराव सवडतकर

जानेफळ (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा )

जानेफळ येथील ग्रामदेवता माता जगदंबेचा आशीर्वाद घेऊन केलेले कार्य पूर्णत्वास जाते अशी जानेफळवासीयांची भावना असून त्यामुळे स्थानिक शिवसेना, भाजपा,राष्ट्रवादी व मित्र पक्षांच्या वतीने नारळ फोडून ग्रामदेवता आई जगदंबेला साकडे घालून तीन वेळा विजयाची हॅट्रिक साधणारे डॉ. संजय रायमुलकर यांचा 2024च्या निवडणुकीत हा मतदानाचा लीड लाखात वाढत जावो अशी साकडे घालत आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.

यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विश्वासराव सवडतकर, विभाग प्रमुख अशोक बोरकर, भाजपाचे गट्टू राठी, शिवसेना शहर प्रमुख सचिन उर्फ मंटू राजूरकर,रामेश्वर मुरडकर, पिंटू बोरबळे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे विस्तारक अमर राऊत, उमेश सदावर्ते विशाल फितवे मनीष मांडगवडे,संदीप नवले, विजय काळे,प्रभाकर आवारे, महेश सवडतकर, उमेश डव्हळकर, बंडू सराफ,प्रशांत मुळे, आदिनाथ वांजाळ,संतोष साळोख, नाना नरवाडे व महायुतीचे पदाधिकारी व गावकरी मंडळी उपस्थित होते.

आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या कार्यकर्तृत्वामुळे प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, चौकार मारुन विजयाचा लिड लाखांवर नेण्यासाठी अहोरात्र मेहनत घेऊ असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या