मेहकर ( अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)
शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार संजय रायमुलकर यांच्या मेहकर शहरातील निवडणूक प्रचाराचा शुभारंभ शारंगधर बालाजी मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते .प्रचंड जल्लोषात शहरातील प्रचाराचा आरंभ करण्यात आला लोणार वेस येथील मारुती मंदिरात दर्शन घेऊन व नारळ फोडून रायमुलकर यांनी आशीर्वाद घेतले.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर, तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर, शहर प्रमुख जयचंद बाठीया, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के, तालुकाप्रमुख कविताताई दांदडे, शहरप्रमुख वैशालीताई सावजी , युवासेनेचे तालुकाअध्यक्ष भूषण घोडे,समाधान साबळे,भाजपचे ऍड शिव ठाकरे, डॉ. सुभाष लोहिया, प्रल्हादअण्णा लष्कर ,ठोकळ महाराज ,पंढरीनाथ देवकर , राजेश निकम , मंदाकिनीताई कंकाळ, ऍड ज्योती अवचार, शिल्पाताई देशमुख, राष्ट्रवादीचे गिरधर पाटील, गजानन सावंत, समीरखान, प्रसिक दुर्योधन यासोबतच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिलीपबापू देशमुख, रामराव म्हस्के ,बबनराव भोसले, बबनराव तुपे आणि राजीव मुंदडा ,नितीन राऊत, भागवत भिसे महाराज, रविराज रहाटे ,आशाताई झोरे, मनोज सावजी गायकवाड, अख्तर चुडीवाले ,मनोज जाधव, विनोद देशमुख, समाधान सास्ते, विकास जोशी ,तौफिक कुरेशी, मंगेश तट्टे, संतोष पवार, डॉ.माल, हर्षल लक्ष्मणराव गायकवाड, हर्षल कुसळकर,विष्णू खंदारकर भास्कर राऊत ,प्रभाकरराव सपकाळ, भीमशक्तीचे भाई कैलास सुखदाने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मारुती मंदिर सभागृहात झालेल्या छोटे खाणी सभेत आमदार संजय रायमुलकर म्हणाले की, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली गत अनेक वर्ष यशस्वीपणे काम केले. मतदार संघाचा विकास केला. यापुढे हीच विकासाची गती कायम ठेवली जाईल. कुठल्याही भूलथापांना बळी न पडता शहरातील नागरिकांनी विकासाचे राजकारण पुढे नेण्यासाठी धनुष्यबाण निशाणीचे बटन दाबून मोठ्या संख्येने मतदान करावे . महायुती एकसंघपणे कार्यरत असल्याने हा विजय आणखी मोठा असेल.
आपल्या भाषणात भाजपचे नेते डॉ सुभाष लोहिया म्हणाले की, इथे महायुतीची प्रचंड हवा असल्याने इतर सर्व उमेदवार निश्चितपणे हवेत उडून जातील. आमदार संजय रायमुलकर सर्व गावांमध्ये तगडा संपर्क ठेवून असल्याने व विकास कामे मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे त्यांच्यापुढे कोणीही प्रतिस्पर्धी असला तरी तो निश्चितपणाने पराभूत होईल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
गेली तीस वर्ष प्रतापराव जाधव ,संजय रायमुलकर यांनी लोकांशी सतत संपर्क ठेवलेला असून ते अहोरात्र जनतेच्या सेवेत असतात. ज्यांना कोणीच ओळखत नाहीत ,असे बाहेरचे उमेदवार रिंगणात आहेत. हे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी आले आहेत .त्यामुळे जनता त्यांना भीक घालणार नाही. हिंदुत्ववादी विचाराच्या सर्व घटकांनी संजय रायमुलकर यांच्या धनुष्यबाण निशाणीवर शिक्का मारून त्यांना विक्रमी मतांनी विजय करावे असे आवाहनही डॉ. लोहिया यांनी केले.
महायुतीला पोषक वातावरण असून रायमुलकर एक लाखापेक्षा अधिक मताधिक्याने विजय होतील ,असा विश्वास शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. आशाताई झोरे यांनीही आपले विचार व्यक्त केले.
भाई कैलास सुखदाने आपल्या भाषणात म्हणाले की, विरोधातील उमेदवार जेव्हा काँग्रेसच्या मंत्र्याचा उपसचिव होता तेव्हा त्याने दुधाळ जनावरांसाठी अनुदान योजनेचे मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांचे अर्ज नामंजूर केले होते व सिंदखेड राजा तालुक्यातील अर्ज मंजूर केले होते. केवळ पैशाच्या जोरावर निवडणूक लढविण्यासाठी तो उमेदवार आला आहे .परंतु लोक त्याला भीक घालणार नाहीत .कारण प्रतापराव जाधव यांच्या अठरापगड जातींना जिवभावाने सोबत घेऊन विकासाचे राजकारण करण्याच्या परंपरेचे पालन आमदार रायमुलकर करतात. त्यांनी दोन्ही तालुक्याचा प्रचंड विकास केलेला आहे वर्षात लोकांशी मोठा संपर्क निर्माण केलेला आहे, त्यामुळे विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही.