मेहकर ( अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा )
काँग्रेसने जाती जातीत तेढ निर्माण करून गचाळ राजकारण केले. निवडणूक काळात विरोधक दिशाभूल करतील त्यावर विश्वास ठेवू नका. मुस्लिम समाजाने शिवसेनेच्या मूळ प्रवाह सोबत यावे आपण विकासाचे ध्येय साध्य करू, असे आवाहन आमदार संजय रायमुलकर यांनी केले.
येथील प्रभाग क्रमांक आठ मध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने आमदार संजय रायमुलकर यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी वरील विचार व्यक्त केले. शिवसेनेचे शहर प्रमुख जयचंद बाठीया, माजी नगरसेवक हनीफ भाई ,तौफिक कुरेशी, दिवाकर मेहकरकर , भालेराव ,राजीव ठेकेदार, सलीम भाई कुरेशी ,रमेश गायकवाड , अशपाक गवळी,चिकू मोकळे प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम करणारे उमदे व्यक्तिमत्व असून त्यांनी राज्याच्या विकासावर भर दिला.
लाडकी बहीण योजनेत पस्तीस टक्के मुस्लिम भगिनी आहेत. मेहकर लोणार तालुक्यात गेल्या दोन वर्षात ४ हजार कोटींची विकास कामे झाली असून हा एक विक्रम आहे, असेही संजय रायमुलकर म्हणाले. मतदार संघात अनेक गावांमध्ये शादीखाने ,कब्रस्तानच्या संरक्षण भिंती, सिमेंट रस्ते आदी कामे मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आली. प्रामाणिकपणे जे सोबत राहतात त्यांचे भले करण्याचा शिवसेनेचा स्वभाव आहे. सोबत या ,सहकार्य करा, विरोधकांच्या भूलथापांना अजिबात बळी पडू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी मुस्लिम समाजातील कुरेशी, गवळी ,शहा ,शेख बिरादरीतील नव्वद युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचा सत्कार संजय रामुलकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यामध्ये समीर कुरेशी, शाहिद कुरेशी ,अब्दुल भाई, जुम्माभाई, जावेद कुरेशी, रहमान भुरीवाले, बशीर भाई भुरीवाले, सादिकशहा ,रफिकशहा, शेख तुमेर,शेख असिब आदींचा समावेश होता.यावेळी जयचंद बाठीया, हनीफ भाई, तौफिक कुरेशी, अश्फाक गवळी ,पठाण काका आदींची भाषणे झाली. कार्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीरभाई पठाण यांनी केले.