मेहकर (अनिल मंजुळकर – रोखठोक न्यूज वृत्तसेवा)
गेल्या पंधरा वर्षात आमदार संजय रायमुलकर यांनी मोहना बुद्रुक आणि परिसरात सर्व गावांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. गत दोन वर्षात नऊ कोटींची विविध विकास कामे मोहना बुद्रुक येथे झाली आहेत, अशी माहिती माझी उपसरपंच सुरेश जानकीराम आडे यांनी दिली.
नदीवरील पुलाचे मोठे बांधकाम झाल्यामुळे जनतेची दळणवळणाची सोय झाली. परिसरातील सर्व गावांमध्ये बंजारा समाज आमदार रायमुलकर यांच्या भक्कमपणे पाठीशी आहे ,असेही ते म्हणाले. बंजारा समाजा सोबतच इतर जनताही पूर्ण ताकदीसह त्यांच्या पाठीशी आहे , असेही चित्र दिसून येत आहे.
मोहन बुद्रुक येथे जलजीवन मिशन योजना सिमेंट रस्ते नदीवरील पुलाचे बांधकाम संरक्षण भिंती ग्रामपंचायत भवन यासह विविध विकास कामे आमदार रायमुलकर यांनी केल्यामुळे बंजारा समाजाचे ते जिवाभावाचे सदस्य बनले आहेत, असेही सुरेश आडे म्हणाले. संजय रायमुलकर यावेळेस निश्चितपणे मोठ्या मताधिक्याने चौकार मारणार असल्याचा दावा आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी केला.