spot_img

आ.संजय रायमुलकर म्हणाले, माय- बाप जनतेच्या आशीर्वादामुळेच विकासगंगा आणू शकलो! आ.डॉ. संजय रायमुलकरांच्या गाव भेट दौऱ्यांना मिळतोय प्रचंड प्रतिसाद!

मेहकर(अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)

२००९ पासून झालेल्या तिन्ही निवडणुकांत तुम्ही मला प्रचंड मताधिक्याने विजयी केले. तुमच्यामुळे एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा विधानसभेच्या सभागृहात जाऊ शकला. आमदार होण्यासाठी मी कधी काम केले नाही.. मात्र काम करत गेलो आणि तुम्ही तुमच्या कामदार लेकाला भरभरून आशीर्वाद दिले. मेहकर विधानसभा मतदारसंघाचा जो जो काही विकास मी करू शकलो तो केवळ मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळेच करू शकलो असे प्रांजळ प्रतिपादन मेहकर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ.संजय रायमुलकर यांनी केले. काल,२८ ऑक्टोबरला लोणार तालुक्यातील मातरखेड, निजामपुर, मोहतखेड, वेणी या गावांचा दौरा आ. रायमुलकर यांनी केला. यावेळी आयोजित कॉर्नर बैठकीत ते बोलत होते.

२००९ ,२०१४ आणि २०१९ या सलग तीन निवडणुकांत चढत्या मताधिक्याने विजयी झालेले आ. संजय रायमुलकर यंदा विजयाचा चौकार मारण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यासाठी आवश्यक भेटी गाठी -कॉर्नर बैठकी यांवर त्यांनी भर दिला आहे. डॉ. रायमुळकर ज्या गावात जातात त्या गावांत आधीपासूनच त्यांच्या प्रतीक्षेत असलेली गावकरी मंडळी त्यांचे जोरदार स्वागत करताना दिसत आहेत.

गावोगावी होणारे स्वागत, कार्यकर्त्यांशी आपुलकीचा संवाद यामुळे आ. रायमुकरांनी अधिकृत प्रचार सुरू होण्याआधीच आघाडी घेतली आहे.सहज उपलब्ध होणार नेता, स्थानिक नेतृत्व आणि मतदार संघातील गावागावात असलेले जिव्हाळ्याचे संबंध ही जमापुंजी आ. रायमूलकर यांचा मार्ग सुकर करतांना दिसत आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या