spot_img

संजय रायमुलकर यांच्यासाठी चार शेतकऱ्यांची शेगाव पायी वारी !

मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा )

विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार संजय रायमुलकर विदर्भातून पहिल्या क्रमांकावर विजयी व्हावे म्हणून पुन्हा एकदा चौकार बाजी मारण्यासाठी बोरी येथील चार शेतकरी पुत्राची बोरी ते शेंगाव पायदळ वारी करत संत गजानन महाराजांना साकडे घालण्यासाठी जात असल्याचे शेतकरी निखिल चनखोरे बोलत होते.

चनखोरे पुढे बोलतांनी म्हणाले की तीन पंचवार्षिक आमदार संजय रायमुलकर यांनी मेहकर व लोणार तालुक्यांसाठी कोट्यावधी निधी खेचून आणला. शांत संयमी व साधा सरळ जन माणसातील आमदार संजय रायमुलकर आहेत. सर्वांच्या सुख दुःखात धावून रायमुलकर येत असतात. कधीही आमदारकीचा गर्व दिसला नाही. प्रत्येक घराघरात संजय रायमुलकरांचे नाव घेतले जाते.
लहानांपासून तर मोठ्या वय वृद्ध लोक संजय रायमुलकर यांना ओळतात. काल संजय रायमुलकर यांनी अर्ज दाखल केला व विदर्भातून विक्रमी मतांनी पुन्हा एकदा चौफेर बाजी मारण्यासाठी आम्ही संत गजानन महाराजांना साकडे घालणार आहोत असे बोलत होते.

यासाठी बोरी येथील शेतकरी निखिल किशोर चनखोरे, अनंता किसन ढगे, भागवत पुंजाजी आव्हाळे, व दगडू दिगंबर नरवाडे हे चार जण शेगावच्या दिशेने पायदळ वारी करत आहेत. विकास पुरुष संजय रायमुलकरांवरचे प्रेम दिसून येते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या