मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा )
एकनाथ शिंदे यांच्या धाडसी नेतृत्वाखाली लोकोपयोगी निर्णय घेतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाची आगामी काळातही गरज असून महायुती सरकारच्या काळात जीडीपी टक्क्याने वाढला, असे आमदार संजय रायमुलकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आज शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी वरील माहिती दिली. स्थिर किमतीवर आधारित वास्तविक जी डी पी दर हा विकासाच्या उन्नतीचे द्योतक असतो, असे सांगून संजय रायमुलकर म्हणाले की महाविकास आघाडीच्या काळात १.९ टक्के असलेला जीडीपी महायुती सरकारच्या काळात ८.५ टक्के झाला. जी डी पी ६.६ ने वाढणे, ही महत्त्वपूर्ण बाब आहे ,असेही ते म्हणाले. माहिती सरकारच्या काळात दहा लाख ५२ हजार घरांची उभारणी करण्यात आली असून शबरी आदिवासी घरकुल योजनेसाठी ७७१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत ,असे सांगून आमदार रायमुलकर म्हणाले की ,शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीसाठी नुकसान भरपाई, पीक विम्याची रक्कम, बचत गटांना सहाय्य ,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, रोजगार निर्मिती ,महिला सशक्तिकरण ,शेतकरी, युवक , आणि इतर शेकडो योजना ,आरोग्य, उद्योगधंदे ,शहरी पायाभूत सुविधा आदी क्षेत्रात मोठे काम झाले आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण झाले आहे.
मेहकर विधानसभा मतदारसंघात चार हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची विकास कामे झाली आहेत, असा दावा करून आमदार संजय रामुलकर म्हणाले की, केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हॅम योजनेतून चारशे कोटींचे रस्ते, आशियाई बँक सहाय्यक ३९० कोटी चे रस्ते, ४३४ कोटींचा लोणार विकास आराखडा, जलजीवन योजना, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण च्या योजना आणि मेहकर, लोणार शहर पाणीपुरवठा योजना यासाठी ,५०२ कोटी रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत.
विक्रमी संकेत सभामंडप, संरक्षण भिंती, गावोगाव सिमेंट रस्त्यांची कामे ,नाली बांधकाम, शादीखाने, स्मशानभूमी सौंदर्यीकरण , पेंटाकळी प्रकल्पाच्या कालव्यासाठी ५८५ कोटींची तरतूद, कोराडी प्रकल्पाच्या कालव्याच्या दुरुस्तीसाठी २६ कोटींची तरतूद अशी अनेकविध कामे विक्रमी संख्येत करण्यात आली आहेत, असेही आमदार रायमुलकर म्हणाले. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीची व पीक विम्याची मोठी रक्कम वेळोवेळी मिळवून दिली आहे. विकास कामांची खूप मोठी जंत्री त्यांनी पत्रकार परिषदेत सादर केली. यावेळी ठोकळ महाराज, राजेंद्र गाडेकर ,गजानन सावंत यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी महायुती सरकारच्या रिपोर्ट कार्डचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर , कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव,तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर, बबनराव तुपे, शहरप्रमुख जयचंदजी बाठीया, युवा सेनेचे तालुकाप्रमुख भूषण घोडे, पिंटू सुरजन , रामेश्वर भिसे, अशोक वारे, सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष अरुण दळवी, भारतीय जनता पक्षाचे ऍड .शिव ठाकरे, प्रल्हादअण्णा लष्कर, अक्षत दीक्षित राहुल पवार रोहित रोहित सोळंके, सारंग माळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे गजानन सावंत, प्रभाकरराव सपकाळ व मित्र पक्षाचे इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. सूत्रसंचालन जयचंद बाठिया यांनी केले.