spot_img

मतदारांनी मतदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवावा : एस.डी.ओ.रवींद्र जोगी

मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)

भारत निवडणुक आयोगामार्फत विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ साठी निवडणुक कार्यक्रम घोषीत करण्यात आलेला असुन नागरिकांनी लोकशाहीच्या या मोठ्या उत्सवात सहभागी होऊन सर्व मतदारांनी आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडावे असे आवाहन! उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांनी केले आहे.स्थानिक उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे आवाहन केले.

यावेळी तहसीलदार निलेश मडके नायब तहसीलदार अजय पिंपरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे माहिती देताना ते म्हणाले की, येत्या २२ ऑक्टोंबर रोजी निवडणुक कार्यक्रमाची अधिसुचना प्रसिध्द करण्यात येणार आहे व अधिसुचना प्रसिध्द झाल्यापासुन दिनांक २९ ऑक्टोबर रोजी पर्यंत नामनिर्देशन पत्र स्विकारल्या जाणार आहे.

नामनिर्देशन पत्राची छाननी दिनांक ३०ऑक्टोबर रोजी होणार असुन दिनांक ४ नोव्हेबर रोजी पर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत असणार आहे.२० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असुन २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी ची प्रक्रीया होणार आहे. विधानसभा मतदार संघामध्ये एकुण ३५० मतदान केंद्र आहेत. मतदान केंद्राची यादी https://ceoelection.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. मेहकर तालुका मतदान केंद्र संख्या २४३ लोणार तालुका मतदान केंद्र संख्या- १०७ एकुण ३५० मतदान केंद्र २०१ स्थळावर निश्चीत करण्यात आलेले आहेत.

त्यापैकी शहरी क्षेत्रामध्ये २० मतदान केंद्र स्थळ आहेत तर ग्रामीण क्षेत्रामध्ये १८१ मतदान केंद्र स्थळ आहेत.मतदार संख्या पुरुष १५९०८६ महीला १४६१०१ तृतीय पंथी ४ असे एकूण ३०५१९१ मतदार आहेत. मेहकर तालुका मतदार संख्या २१०९०३ तर लोणार तालुका मतदार संख्या ९४२८८ आहे.दिव्यांग मतदार संख्या १८२४ असुन पुरुष १२०९ महीला ६१५ आहेत.

८५ वर्षे वयापेक्षा जास्त वय मतदार संख्या३८६५ मतदारांना मतदार नोंदणी करण्याकरीता नामनिर्देशन पत्र भरण्याच्या शेवटच्या दिनांकाच्या दहा दिवस अगोदर पर्यंत नाव नोंदणी करीता अर्ज भरता येतात म्हणजेच दिनांक १९ ऑक्टोबर रोजी पर्यंत मतदार नोंदणी केलेले मतदार विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादी मध्ये समाविष्ट होतील.

मेहकर मतदार संघामध्ये आदर्श आचार संहिता पालन करण्याकरीता चमू तयार करण्यात आलेल्या आहेत.मतदारांना आदर्श आचार संहितेचे उल्लघंन करणाऱ्या विरुध्द तक्रार करण्यासाठी CVIGIL ॲप उपलब्ध करुन देण्यात आलेले असुन त्यामधुन स्वत:च्या मोबाईल वरुन तक्रार नोंदविता येणार आहे.

उमेदवारांना त्यांच्यावर नोंदविलेल्या गुन्हयाची माहिती दैनिक वृत्तपत्रामधुन प्रसिध्द करावी लागणार आहे. तसेच मतदारांना उमेदवारांची माहिती केवायसी या ॲप वर मिळणार आहे. महाराष्ट्र शासन मतदार नोंदणी अधिकारी मेहकर,सर्व सेतु सुविधा केंद्र चालक मेहकर तसेच सर्व सी.एस.सी. केंद्र चालक आपल्या गावामधील ज्या नवमतदारांना मतदार यादीमध्ये नविन नाव नोंदणी करायची असेल अशा मतदारांना योग्य ते ऑनलाईन सहाकार्य आपल्या स्तरावरुन करण्याची सूचना करण्यात आली असल्याची माहिती रवींद्र जोगी यांनी दिली.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या