spot_img

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात मेहकर,लोणार तालुक्यातील ५६ गावांचा समावेश आमदार संजय रायमुलकरवर गावागावात होत आहे वर्षाव

मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)

शासनाच्या कृषी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या निर्णयात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन मध्ये मेहकर लोणार तालुक्यातील ५५ गावांचा समावेश करण्यात आला आहे.
शेतीविषयक नवीन संशोधनाचा उन्नत शेतीसाठी उपयोग करणे, पाण्याचा कार्यक्षम वापरण्यासाठी उपाययोजना करणे, संवर्धित व पुनरुज्जीवीत हवामान शेती पद्धतीचा वापर करून शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी या प्रकल्पा अंतर्गत शेतकऱ्यांना भरीव मदत केली जाणार आहे.

पोकरा म्हणून ही योजना ओळखली जाते. १० ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मेहकर तालुक्यातील वरदडी वैराळ ,हिवराखुर्द ,पारडी, देळप, उटी, मुंदेफळ, गोमेधर ,लोणी गवळी, शेलगाव देशमुख, पांगरखेड, उमरा,गोहगाव , मादणी, आरेगाव, जवळा ,मो, मोळी ,शहापूर, अंजनी, नागापूर, बाभुळखेड, चायगाव ,चोंडी, पारडा ,बरटाळा, सारंगपूर ,जयताळा, चिंचोली बोरे, तर लोणार तालुक्यातील मातरखेड, निजामपूर, वडगाव तेजन ,बोरखेडी, वेणी ,कोयाळी आदी एकूण ५५ गावांचा यात समावेश करण्यात आला आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प प्रकल्पामध्ये मेहकर लोणार तालुक्यातील गावांचा समावेश करण्यात यावा यासाठी आमदार संजय रायमुलकर यांनी अथक पाठपुरावा केला होता त्याला आता यश आले असून दुसऱ्या टप्प्यात दोन्ही तालुक्यातील 55 गावांचा समावेश करण्यात आला आहे. सदरील सर्व गावांमधील शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा फायदा होणार असून शेती उपयोगी साहित्य, बी बियाणे, कीटकनाशके याबरोबरच इतरही मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्रातील २१ जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार असून त्यासाठी राज्य शासनाने सहा हजार कोटींची तरतूद केली आहे. याबाबतचे शासकीय परिपत्रक संबंधित खात्याचे उपसचिव संतोष कराड यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेना नेते मदन पाटील होणे यांनी आमदार संजय रायमुलकर यांचे पेढे तुला करणार असल्याचे सांगितले आहे

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या