spot_img

१ हजार ४७५ कोटींच्या रस्ते कामांचे आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते भूमिपूजन , मेहकर व लोणार तालुक्यातील विकासकामे प्रगतीपथावर !

मेहकर: (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)
आशियाई बँक सहायित अमडापूर जानेफळ केनवड या ३९० कोटी रुपये खर्चाच्या सिमेंट रस्त्याचे आणि इतर रस्त्यांचे आभासी पद्धतीने भूमिपूजन आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते आज मारुती पेठ येथे झाले. विहित कालावधीमध्ये उत्तम दर्जाचे रस्ते बांधकाम संबंधित खात्यांनी करावे, रस्ते समृद्ध झाले तर विकासाची गती वाढते. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघात रस्त्यांचे जाळे विणले गेले आहे, असे यावेळी बोलताना आमदार रायमुलकर म्हणाले.
सार्वजनिक बांधकाम खात्यासोबतच महाराष्ट्र राज्य पायाभूत सहाय्य महामंडळाची स्थापना राज्य शासनाने केली असून त्या अंतर्गत आशियाई बँकेच्या सहकार्याने अमडापूर ते केनवड हा जानेफळ मार्गे जाणारा महामार्ग ३९० कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येणार आहे.
या आगळ्यावेगळ्या रस्त्यासह मेहकर ते रिसोड हा १७५ कोटी रुपये खर्चाचा रस्ता, शेंदुर्जन ते सुलतानपूर, वेणी ,मोप जाणाऱ्या ३२५ कोटी रुपये खर्चाच्या रस्त्यांचे भूमिपूजन आभासी पद्धतीने आमदार संजय रायमुलकर यांच्या हस्ते झाले. मारुती पेठ येथे हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. राज्यातील इतर रस्त्यांसोबतच या रस्त्यांचेही आभासी पद्धतीच्या भूमिपूजन समारंभात मुंबई येथून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार उपस्थित होते.

१ हजार ४७५ कोटी रुपये खर्चाच्या या रस्त्यांमुळे मेहकर मतदारसंघाच्या दळणवळणासाठी मोठी मदत होणार असून गेल्या अडीच वर्षात मेहकर मतदार संघात अनेक दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करण्यात आली आहे, असे यावेळी बोलताना आमदार रायमुलकर म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकिशोर निकस यांनी केले.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर, युवा सेनेचे तालुका अध्यक्ष भूषण घोडे, डॉ.सतीश कुलकर्णी , गणेश बोचरे, विलास मोहरूत, नितीन राऊत ,गिरधर पाटील, कैलास चवरे , तोलाजी जाधव, मंटू राजुरकर, माधवराव आरसोडे, किशोर चांदणे, , अशोक पसरटे, शिवसेना नेते हिमंतराव आवले .सरपंच पती गजानन वडणकर ,सुभाष खुरद, , लोलुरे, जगन दांदडे , कंत्राटदार राजीव काटे आधी प्रामुख्याने उपस्थित होते.
आपल्या भाषणात संजय रायमुलकर पुढे म्हणाले की , उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात शिवसेनेच्या आमदारांना अवमानकारक वागणूक मिळाली. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा इथला गड अभेद्य आहे .कारण त्यामागे निष्ठावान शिवसैनिकांची ताकदवान फळी आणि प्रतापरावांचे कुशल नेतृत्व आहे. अमडापूर केनवड या नवीन ४९ किलोमीटरच्या रस्त्यामध्ये पूल वजा बंधारा आणि इतर ७४ पूल आहेत .दहा मीटर रुंदीचा हा रस्ता होणार असून गावांना जोडणारे जोड रस्तेही बांधण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खंबीर नेतृत्वामुळे मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली. पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच असतील, असे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. समृद्धी जवळच्या नवनगर निर्मितीमध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी समृद्धी प्रमाणे मोबदला द्या अशी मागणी केली आहे त्यांचा हे प्रश्न लवकरच सोडविण्यात येईल, असे सांगून आमदार रायमुलकर म्हणाले.
यावेळी गणेश बोचरे, विश्वासराव सवडतकर ,गिरधर पाटील यांचीही भाषणे झाले. कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नंदकिशोर निकस यांनी केले.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या