spot_img

खासदार श्रीकांत शिंदे यांची आज मेहकरात जाहीर सभा जास्तीत जास्त संख्येने शिवसैनिकांनी हजर राहण्यासाठी आव्हान 

मेहकर : (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)
शिवसेना जनसंवाद दौऱ्याच्या अनुषंगाने शिवसेना नेते खासदार श्रीकांत शिंदे यांची आज मेहकरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. स्वातंत्र्य मैदानावर आयोजित या सभेसाठी केंद्रीय मंत्री ना प्रतापराव जाधव यांच्यासह खासदार राहुल शेवाळे ,खासदार धैर्यशील माने, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, आमदार संजय रायमुलकर हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

या सभेला शिवसैनिकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश तात्या वाळूकर लोणार तालुकाप्रमुख भगवान सुलतानी महिला आघाडी प्रमुख कविताताई दांदडे, अंजली गवळी महिला आघाडी लोणार तालुकाप्रमुख , मेहकर शहर प्रमुख जयंत भाटिया, लोणार शहर प्रमुख पांडुरंग सरकटे, महिला आघाडी मेहकर शहर प्रमुख सौ वैशाली सावजी, युवा सेनेचे तालुकाप्रमुख भूषण घोडे, यांनी केले आहे.

शिवसेना मुख्यमंत्री पुत्र संसद रत्न डॉ. श्रीकांत शिंदे यांची शिवसेना जनसंवाद दौऱ्याच्या अनुषंगाने आज पहिल्यांदाच मेहकर शहरात येत असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या