spot_img

स्वछतेमुळे शहराच्या सौंदर्यात भर पडते , त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव

 

मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)

शहराची स्वच्छता राखणे हे केवळ एकट्या नगरपालिकेचेच काम नसून त्यासाठी नागरिकांनी उस्फुर्त सहभाग नोंदवणे महत्त्वाचे आहे. स्वच्छतेमुळे शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडते .त्यामुळे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केंद्रीय आयुष, आरोग्य ,कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.
स्वच्छता अभियान २.० अंतर्गत मेहकर शहरामध्ये स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता अभियान 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर या कालावधीत राबविण्यात आले. शहराच्या विविध भागांमध्ये या अभियानाच्या निमित्ताने स्वच्छतेचे मोठे काम नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आले. सदर अभियानाचा समारोप आणि उत्कृष्ट कार्य केलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना बक्षीस वितरण समारंभ आज नगरपालिकेत आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी नामदार प्रतापराव जाधव बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार संजय रायमुलकर होते. प्रारंभी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार मुख्याधिकारी रामराजे कापरे यांनी केला. त्यांनी प्रास्ताविक भाषणातून नगरपालिकेने राबविलेल्या स्वच्छता अभियानाचा आढावा घेतला.

यावेळी मार्गदर्शन करताना नामदार जाधव पुढे म्हणाले की, केवळ नगरपालिकेनेच स्वच्छता करावी अशी धारणा नागरिकांनी ठेवू नये .प्रत्येकाने या कामात योगदान द्यावे शहरातील अतिक्रमणे ही शहराच्या सौंदर्यात बाधा आणतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याकडेही लक्ष द्यावे, असा सूचक इशारा त्यांनी दिला. सफाई कर्मचाऱ्यांनी शहरात राबविलेल्या स्वच्छता अभियानाचे आमदार संजय रायमुलकर यांनी आपल्या भाषणातून कौतुक केले. हे माझे शहर आहे ,अशी भूमिका ठेवून सर्वांनी स्वच्छतेच्या कामात सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. स्वच्छता मोहिमेत उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यावेळी नामदार जाधव व आमदार संजय रामुलकर यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले. एक झाड आईसाठी या अभियाना अंतर्गत प्रतापराव जाधव, संजय रायमुलकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.सर्वांनी यावेळी स्वच्छता राखण्याची शपथ घेतली.

यावेळी उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, तहसीलदार निलेश मडके,अजय पिंपरकर , सहाय्यक गटविकास अधिकारी संदीप मेटांगळे ,ठाणेदार शिंगटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर, जिल्हा उपप्रमुख राजेंद्र गाडेकर,शहर प्रमुख जयचंद भाटिया, महिला आघाडीच्या मायाताई मस्के, वैशालीताई सावजी, कविताताई दांदडे, रविराज रहाटे, नीरज रायमुलकर, युवा सनेचे भूषण घोडे, अख्तर चुडीवाले ,तौफिक कुरेशी, हनीफ गवळी ,मनोज जाधव ,समाधान सास्ते, अक्काताई गायकवाड त्याचप्रमाणे नगरपालिकेचे अजय चैताणे, सुधीर सारोळकर, अभियंता अजय मापारी, संजय गिरी, श्रीकृष्ण जयवाळ, गणेश डोंगरे, संतोष राणे, अनिल मुळे, विशाल शिरपूरकर, शेख जफर, बंडू जवंजाळ आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या