spot_img

अरे बापरे, आता पासुनच सिद्धार्थ खरात यांनी चर्मकार समाजातील नेत्यांना डावलले, उ बा ठा गटाचे जिल्हा संघटक व युवा सेनेच्या उपजिल्हाप्रमुखांचे नाव कार्यक्रम पत्रिकेतून गायब ! उ. बा .ठा गटात चर्चेला उधाण……

मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)

उद्या तीन ऑक्टोंबर रोजी मेहकर शहरात होऊ घातलेल्या उबाठा गटाकडून परिवर्तन मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. पण् सिद्धार्थ खरात यांनी चर्मकार समाजातील नेत्यांना डावलले असल्याचे कार्यक्रम पत्रिकेत दिसून येत आहे. त्यामुळे उ बा ठा गटात चर्चेला उधाण आले आहे.

विधानसभेवर लक्ष ठेवून असणारे सिद्धार्थ खरात नुकतेच मेहकर शहरात आले आहेत. आपल्याला भावी आमदार व्हायचे म्हणून ते स्वप्न रंगवत आहेत. त्यामुळे त्यांनी मेहकर शहरात परिवर्तन मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिवर्तनाचा निर्धार मतदारसंघातील जनतेला केला आहे. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतकऱ्यांना अनुदान द्या, शेतमालाला हमीभाव द्या, वन्य प्राण्यांच्या त्रासापासून बंदोबस्तासाठी 90 टक्के अनुदान द्या, बेरोजगाराला हाताला काम द्या, आणि सर्वसामान्यांना घरकुल उपलब्ध करून द्यावीत अशा विविध मागण्या संदर्भात विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, सहप्रमुख जगन दादा मेहेत्रे, जिल्हाध्यक्ष जालिंदर बुधवत, उपजिल्हाप्रमुख आशिष रहाटे, या परिवर्तन मोर्चात सहभागी होऊन मार्गदर्शन करणार असल्याचे पत्रिकेत नावे आहेत.

पण एवढ्या मोठ्या नेत्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे बोलल्या जात आहे. कारण उ बा ठा गटाला नवसंजीवनी देणारे निष्ठावान कार्यकर्ते तथा नेते डॉक्टर गोपाल बछिरे, युवा नेते प्रकाश दादा डोंगरे, किसना पाटील या तिघांनी बुलढाणा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना जवळ करून उ बा ठा गटाला नवसंजीवनी दिली आहे.

अन् निवडणुका डोळ्यावर ठेवून मुंबई येथून येणारे सहसचिव सिध्दार्थ खरात यांनी पंधरा दिवसात मोर्चे बांधणी सुरू केली आहे. कोणत्याच गावात जनसंपर्क नसणाऱ्या खरातानी चर्मकार समाजातील वरिष्ठ नेत्यांना डावलले असल्याने उ बा ठा गटात नाराजी व्यक्त केली जात आहे. उ बा ठा गटाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख पद असणारे प्रकाश दादा डोंगरे व किसना पाटील यांना पत्रिकेतून वगळल्यामुळे उ बा ठा गटात गटबाजी दिसून येत आहे.
त्यामुळे उद्या होणाऱ्या परिवर्तन मोर्चा बद्दल उ बा ठा गटातील नेत्यांसह कार्यकर्ते मध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याचे बोलल्या जात आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही शिवसेनेत काम करत आहे . काम करत असताना 80% समाजकार्य आणि 20 % राजकारण ही भूमिका पार पाडत असताना आणि अनेक गोर गरीब जनतेशी संपर्क आल्या मुळे त्यांच्या अनेक समस्यांची सोडवणूक केली आणि जनतेनेही आम्हाला भर भरून प्रेम दिले त्याच प्रेमापोटी आणि जनतेच्या आशिर्वादामुळे आज मेहकर विधानसभेची जनता आमच्या सोबत जुळलेली आहे परंतु काही राजकीय हव्यासापोटी काही पैश्याच्या भरोश्यावर आपण कसे मोठे आहोत याचा आव आणून स्थानिक पदाधिकारी याना दूर ठेऊन घेण्यात आलेल्या मोर्चामध्ये फक्त आणि फक्त आपण मोठे आहोत हे दाखवण्यासाठी इतर पदाधिकाऱ्यांना पत्रिकेतून दूर ठेवण्यात आले
स्थानिक लोकांच्या आणि कार्यकर्त्यांना दूर ठेवल्या मुळे आम्ही कार्यक्रमाला उपस्थित राहू नये अशी सर्व निष्ठावंत शिवसैनिकांची इच्छा आहे

 

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या