मेहकर:-(अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)
मेहकर व लोणार तालुक्यातील परवाना धारक वाईन बार असोसिएशनच्या वतीने मेहकर व लोणार तालुक्यातील सर्व धाबे,खानावळ,पानपट्टी तसेच छोट्या मोठ्या हॉटेलवर अवैध पणे सबंधित विभागाच्या आशीर्वादाने सर्रासपणे अवैध देशी व विदेशी दारू विक्री जोमात सुरु असून त्याचा परिणाम परवानाधारक वाइन बार चालकांच्या व्यवसायावर झाला आहे त्यामुळे ही अवैध देशी व विदेशी दारू विक्री तत्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी मेहकर लोणार तालुक्यातील वाइन बार असोसिएशनच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी यांचेकड़े निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या संदर्भात पोलिस उपविभागीय पोलिस अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की आम्ही लाखो रुपये खर्च करून शासनाचा परवाना घेऊन बांधकाम करतो व्यवसाय सुरु करतो सर्व नियमांचे पालन करतो परंतु मेहकर व लोणार तालुक्यातील सर्व धाबे,खानावळ व पानपट्टी येथे अवैध देशी व विदेशी दारुची विक्री होत आहे त्यामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होत असून आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
नुकतेच किंनगाव जट्टू येथील परवानाधारक हॉटेल दर्श वाइन बारचे मालक यांना अवैध देशी व विदेशी दारु विक्रेत्याने जीवे मारण्याची धमकी दिली आहे त्याच्या जिवाचे काही बरे वाइट झाल्यास याची जबाबदारी प्रशासनाची राहील आम्ही परवाना धारक शासनाला करोड़ो रूपयांचा महसूल देत आहोत त्या उलट अवैध दारू विक्रेते शासनाचा महसूल बुडवत आहेत तरी, आपण तत्काळ या सर्व अवैध देशी व विदेशी दारू विक्रेत्यावर कड़क कारवाई करावी अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू याची नोंद घ्यावी निवेदनावर मेहकर लोणार तालुक्यातील सर्व परवाना धारक वाइन बार चालकांच्या स्वाक्षरी आहेत