मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)
गोहगाव दांदडे, शेलगाव देशमुख परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी आमदार संजय रायमुलकर यांनी केली. अतिवृष्टीमुळे सोयाबीन ,कापूस, मका पिकांचे मोठे नुकसान झाले असून सदर नुकसानीचे त्वरित पंचनामे करून सर्वेक्षणअहवाल वरिष्ठांकडे सादर करावे ,असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
२६ सप्टेंबर रोजी गोहगाव दांदडे ,शेलगाव देशमुख या गावांच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस झाल्याने उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचून असल्याने पिके सडण्याची भीती निर्माण झाली आहे.सदरची माहिती मिळताच आमदार संजय रायमुलकर यांनी तारीख २७ रोजी उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी, तहसीलदार निलेश मडके ,उपगट विकास अधिकारी संदीप मेटांगळे, तालुका कृषी अधिकारी किशोर काळे,नायब तहसीलदार अजय पिंपरकर यांच्यासह भेट देऊन नुकसानग्रस्त शेतांची पाहणी केली.
परिसरातील शेतकऱ्यांनी यावेळी आमदार रायमुलकर यांना पिकांच्या नुकसानीची माहिती देऊन शासनाकडून मदत मिळवून देण्याची विनंती केली.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सर्वेक्षण अहवाल वरिष्ठांकडे त्वरित सादर करण्याबाबतचे आदेश आमदार संजय रायमुलकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेंद्र पळसकर, शिवसेना तालुकाप्रमुख सुरेशतात्या वाळूकर,जिल्हा परिषदेचे माजी सभापती केशवराव जागृत, दिलीपराव देशमुख ,कैलास खंडारे ,शरद जाधव ,गोपाल पाखरे ,उत्तमराव परमाळे ,धोंडगे यांच्यासह अनेक मान्यवर पाहणी दौऱ्यात सहभागी होते.