spot_img

छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृहासह मेहकर शहरातील १६ कोटींची विकासकामे मंजूर आमदार संजय रायमुलकर यांच्या पाठपूराव्याला यश.

मेहकर (अनिल मंजुळकर. रोखठोक न्युज वृत्तसेवा)

नागरिकांच्या मागणीनुसार मेहकर शहरातील शाळा क्र.६ जवळील नगरपरिषदेच्या खुल्या जागेत ५ कोटी रुपये खर्चून छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृहाची उभारणी केली जाणार आहे. या कामासह मेहकर शहरातील विविध भागातील विकास कामांसाठी १६ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे.

केंद्रीय आयुष, आरोग्य, कुटुंब कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार संजय रायमुलकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे सदर विकासकामे मंजूर झाली आहेत.महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने काल ता. २५ सप्टेंबर रोजी उपसचिव श्रीकांत अडांगे यांच्या स्वाक्षरीने प्रसृत केलेल्या परिपत्रकांन्वये या विकास कामांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.

नगरपरिषदेच्या गवळीपुरा भागातील खुल्या जागेत शादीखाना बांधकामासाठी ५० लाख रुपये, प्रभाग क्रमांक तीन मधील लोहार समाजासाठी सभामंडप आणि संरक्षक भिंत ५० लाख रुपये, दत्त मंदिर सभामंडप बांधकाम २५ लाख, मार्तंड गुरु मंदिर सभामंडप आणि परिसर विकास या कामासाठी २५ लाख रुपये , खर्च नगरपालिकेच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळांच्या बांधकामासाठी एक कोटी ७० लाख रुपये.

राजीवभाऊ काटे यांच्या घरामागील नगरपरिषदेच्या खुल्या जागेला संरक्षण भिंत पन्नास लाख , ओलांडेश्वर संस्थान जवळील खुल्या जागेला संरक्षकभिंत ५० लाख रुपये , शर्मा लेआउट मल्टी हॉस्पिटलच्या बाजूला खुल्या जागेला संरक्षक भिंत ३० लाख रुपये, विविध खुल्या जागेत ओपन जिम साहित्य, खेळाचे साहित्य बसविणे, विद्युतीकरण करणे यासाठी एक कोटी रुपये, राहुल काळे घरामागील नगरपरिषदेच्या खुल्या जागेला संरक्षक भिंत बांधून उद्यानाचा विकास करणे ४० लाख, प्रभाग क्रमांक चार मधील चैतने घरामागील नगर परिषदेच्या खुल्या जागेला संरक्षक भिंत व उद्यान विकास ४० लाख रु., प्रभाग चार मधील स्व. आव्हाळे यांच्या घरासमोर खुल्या जागेत संरक्षक भिंत आणि उद्यान विकास ३० लाख , यशवंत मैदान स्टेडियम च्या बांधकाम व संरक्षक भिंत पन्नास लाख रु., पैनगंगा स्मशानभूमी आणि जानेफळ रोडवरील स्मशानभूमीचे नूतनीकरण दोन कोटी रुपये, पळसेश्वर मंदिराजवळील खुल्या जागेला संरक्षक भिंत तीस लाख रु., माळी पेठ मधील मारुती मंदिराजवळील खुल्या जागेला संरक्षक भिंत ५० लाख , महानुभावसमाज स्मशानभूमी संरक्षक भिंत ५० लाख रु., शीतला माता मंदिरा जवळ संरक्षक भिंत आणि उद्यान विकास ५० लाख रुपये. या कामांच्या मंजुरीबद्दल आमदार रायमुलकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,अजितदादा पवार यांचे विशेष आभार मानले आहेत.

वरीलप्रमाणे मेहकर शहरातील विकास कामांसाठी १६ कोटी रुपयांची मंजुरी राज्य शासनाने दिल्याची माहिती आमदार संजय रायमुलकर यांचे स्वीय सहाय्यक रुपेश गणात्रा यांनी दिली आहे.

ताज्या बातम्या

ताज्या बातम्या